Rupee 1, infomarathi
- माहिती, इन्फोमराठी

वस्तूचीं किंमत 1 रूपये कमी असण्यामागे आहे हे कारण!!!

शॉपिंगला गेल्यावर हि गोष्ट तुम्ही नक्की पाहिली असेल बऱ्याच वस्तूंची किंमत राउंड फिगर मध्ये नसते. म्हणजेच एक रुपया कमी असते. जसे की 99 रूपये रुपये 499 रूपये अशा पद्धतीने असते. चला तर जाणून घेऊयात असं का करतात दूकानदार 1 रूपया कमी असे मूल्य ठेवून वस्तू विक्री करण्याच कारण समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. समजा एका वस्तूचे मुल्य 1000 रूपये आहे.

पुढे तीच वस्तू जर 999 रूपयांना आहे तर अशावेळी आपला मेंदू असा विचार करतो की ज्या वस्तूची किंमत तीन आकड्यात आहे. ती वस्तू स्वस्त आहे. म्हणूनच दुकानदार वस्तूंच मुल्य एक रूपया कमी ठेवतात. आणि आपल्याला एखादी वस्तू विकत घेण्यासाठी उद्युक्त करतात. कंपन्या वस्तूंचे मूल्य एक रुपया कमी ठेवून मोठ्या प्रमाणावर वस्तू विक्री होते. शिवाय दुकानदारांकडे एक रुपया कमी किंमत असलेल्या वस्तूंसाठी सुट्टे पैसे नसल्याचंही कारण बऱ्याच वेळा असत.

अशावेळेस 99 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकली जाते. सुट्टे पैसे नसल्याने दुकानदार महिन्याला तीन हजार रुपये ते पाच हजार रुपये अतिरिक्त कमाई करतात. यामुळेच दुकानदार अशा प्रकारच्या किंमत असलेल्या वस्तू विकण्या मध्ये उत्सुक असतात. तेव्हा इथून पुढे शॉपींग ला गेल्यावर लक्षात असू द्या हि माहिती. आम्हाला नक्की सांगा ही माहिती आपल्याला कशी वाटली.आणि तुमच्या उपयोगी पडेल अशी माहिती आपल्या मराठी भाषेत वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला इमेलद्वारे पाठवू शकता.

लेखन – त्रिवेद डुंबरे, Www.infomarathi.in 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *