infomarathi, v shantaram
- माहिती, इन्फोमराठी

पहील्या भारतीय बोलपटाची निर्मिती करणारा मराठी माणूस

प्रयोगशील चित्रपती व्ही शांताराम | भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महान कलाकार प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखले जाते. व्ही शांताराम यांचा जन्म कोल्हापूर मध्ये 18 नोव्हेंबर 1901 रोजी झाला. वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांचे फिल्मी करिअर सुरू झाल. व्ही शांताराम यांनी फत्तेलाल व दामले यांच्या सहकाऱ्यांनी 1929 मध्ये प्रभात कंपनीची स्थापना करून चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. प्रभात कंपनीने भारतीय चित्रपट सृष्टीत खऱ्या अर्थाने इतिहास घडवला. ही कंपनी नावारूपाला आणण्यात व्ही शांताराम यांचा सिंहाचा वाटा  होता.

या कंपनीच्या माध्यमातून ” अयोध्येचा राजा” हा  पहिला बोलपट व मराठी भाषेतील ही पहिला बोलपट निर्माण केला गेला. त्यानंतरच्या काळात प्रभात कंपनीच्या माध्यमातून संत तुकाराम, कुंकू, धर्मात्मा, शेजारी यासारखे यासारखे एकाहून एक सरस चित्रपट निर्माण केले गेले. हे सर्व चित्रपट कमालीचे लोकप्रिय झाले. भारतीय चित्रपट सृष्टीत ज्या काळात पौराणिक  चित्रपटांच्या निर्मितीत अडकून पडली होती. त्या काळात शांताराम यांनी सामाजिक विषयावरील चित्रपटाची निर्मिती करून वेगळेपणाचा प्रत्यय आणून दिला. त्यांचे दिग्दर्शन  चित्रपटातील यशाची जमेची बाजू होती. पुढे व्ही शांताराम यांनी प्रभात कंपनी सोडली व राजकमल ही स्वतःची वेगळी चित्रपट संस्था काढली. 

या कंपनीच्या माध्यमातून ” दो आखे बारा हात” हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला या चित्रपटाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला होता. एवढेच काय तर राष्ट्रपती पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला होता. व्ही  शांताराम यांच्या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनातून केलेले सेवाकार्य त्यांच्या चित्रपटांमधून दिसून यायचे.

अशा या महान चित्रपट निर्मात्याला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन उचित गौरव केलेला आहे. शिवाय 1985 मध्ये दादासाहेब फाळके पारितोषिक त्यांना देण्यात आले. कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा ही माहिती आपल्याला कशी वाटली. आणि तुमच्या उपयोगी पडेल अशी माहिती आपल्या मराठी भाषेत वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

लेखन  – त्रिवेद डुंबरे, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *