Sindhudurg Fort, Sindhudurg Jilha, Maharashtra Fort, Shivajiraje
- माहिती, इतिहास, इन्फोमराठी

शिवलंका सिंधुदुर्ग किल्ला इतिहास आणि बरच काही

आज आपल्याला दिसणारे किल्ले म्हणजे शिवाजी महाराजांनी घाम गाळून अमाप पैसा खर्चून उभारलेल क्रांती पुष्प अशाच एका दुर्लक्षित दुर्गाची माहिती आपण घेणार आहोत. सिंधदुर्ग जिल्ह्यातील मालवण पासून जवळच खडकाळ बेटावर उभारलेला  सिंधुदुर्ग हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस ५१० किलोमीटर अंतरावर असून शिवाजी महाराजांनी जंजिर्‍याच्या विजयाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर साधारणपणे १६६४ ते १६६७ च्या दरम्यान हा किल्ला उभारला.

हिरोजी इंदुलकर यांच्यावर त्याची जबाबदारी सोपवली किल्ल्याच्या बांधकामासाठी गोव्याहून खास शंभरपेक्षा अधिक तज्ञ पोर्तुगीजांना बोलावलं होतं तसेच या बांधकामासाठी तीन हजार कामगार तीन वर्षे झटत होते. सुरतेची लूट यासाठी वापरण्यात आली होती. ४८ एकर चा किल्ला असून किल्ल्याला चार किलोमीटर लांबीचा नऊ मीटर उंच तीन मीटर रुंद असा तट आहे. तसेच ४२ बुरुज आहेत. 

मराठ्यांचा हा एक महत्त्वपूर्ण असा किल्ला होता. मोठे दगड आणि साधारणपणे ८० हजार किलो लोखंड वापरून याच्या भिंती बांधल्या आहेत. याचे वेगळेपण म्हणजे याचा पाया शिसे ओतून उभारला आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ दोन घुमट आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मंदिरात देशातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा दाढी विरहित पुतळा आहे. किल्ल्यात मंदिर तलाव आणि तीन विहिरी आहेत. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम – ताराबाई, आंग्रे, पेशवे कोल्हापूरच्या भोसले घराण्याकडे  पुढे हा किल्ला हस्तांतरीत होत गेला. शेवटी १७६५ साली ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला. आणि त्याला ऑगस्टस असं नाव दिलं १८१८ नंतर ब्रिटिशांनी येथील संरक्षण संरचना बदलली आणि त्यांच्या तोफा काढून टाकल्या. 

मालवण येथून बोटीच्या सहाय्याने किल्ल्याकडे जाता येत. कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा ही माहिती आपल्याला कशी वाटली. आणि तुमच्या उपयोगी पडेल अशी माहिती आपल्या मराठी भाषेत वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

लेखन – त्रिवेद डुंबरे, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *