Doctor Abhay Bang infomarathi
- गोष्टी, इन्फोमराठी

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी दारूबंदीची मोहीम यशस्वी करणारे – डॉ. अभय बंग

आपल्या देशातील आदिवासींना समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या पत्नी राणी बंग यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्राच्या मागास असलेल्या जिल्ह्यांपैकी एक असला आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विभागात कार्यरत असलेले बंग पती-पत्नी तेथील गरीब व निरक्षर आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अभय बंग यांचा जन्म 1950 मध्ये वर्धा वर्धा येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव ठाकूरदास बंग आईचे नाव सुमन बंग. अभय यांचे संपूर्ण बालपण वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात गेले. त्यांचे शिक्षण नयी तालीम शिक्षण पद्धतीने झाले. त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांच्या पुढील आयुष्याचा देण्यास कारणीभूत ठरले अभय बंग यांच्यावर महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा विशेष प्रभाव होत नाहीत मध्ये शिक्षण घेत असतानाच गांधींच्या विचाराकडे आकर्षित झाला त्यांच्यावर पुढेही कायम राहिला.

यामुळेच त्यांनी गडचिरोलीसारख्या मागास आदिवासी विभागात सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणजे ” शोधग्राम” ची स्थापना 1986 मध्ये दोघे पती-पत्नी गडचिरोली येथे वास्तव्याला गेले. त्यांनी तेथील आदिवासींना खेडेगावातील गोरगरीब लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले. गडचिरोली स्थानिक लोकांसाठी कार्य करण्यास सुरुवात केल्यानंतर अभय बंग यांनी तेथे शोधग्राम ची उभारणी केली. शोधग्राम म्हणजे एक प्रकारच्या आदिवासी गावच.

आदिवासी भागात कार्य करावयाचे तर आदिवासींच्या जीवनात एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या जाणिवेतून आदिवासींना परकेपणा आणि किंवा नवखेपणा वाटणार नाही. अशा पद्धतीने आरोग्य केंद्राची रचना केली पाहिजे असा विचार डॉ. अभय बंग यांनी केला अन त्यातूनच  साकार झालेले गाव म्हणजेच शोधग्राम होय. गडचिरोली विभागामध्ये आरोग्य संबंधी संबंधीची एक गंभीर समस्या म्हणजे बालमृत्यू डॉक्टर अभय बंग यांनी बालमृत्यूच्या समस्येकडे विशेष लक्ष पुरवले. आदिवासी विभागातील बालमृत्यूची न्यूमोनिया व कुपोषण हि मुख्य कारण होती.

डॉक्टर अभय बंग यांनी बालकांमधील न्युमोनिया आजारावर मात करण्यासाठी घरोघरी जाऊन नवजात बालकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यावर भर दिला. त्यांनी त्यासाठी आरोग्यदूत हि कल्पना राबवली. आरोग्यदुत मार्फत अनेक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिले जायला लागल्या बालकांची काळजी घेतली जाऊ लागली. त्यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली विभागातील बालमृत्यू मध्ये खुप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अजून एक समस्या होती ती म्हणजे दारू पिण खूप मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांना दारूचे व्यसन होत.

त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतच होता. दारूमळे लोकांच्या कौटुंबिक जीवनाची वाताहत होत होती ते डॉ. बंग यांनी पाहील होत. यावर काही केल पाहीजे हा विचार करून त्यांनी  गडचिरोली भागात दारूबंदी व्हावी यासाठी आंदोलन केले. त्याचप्रमाणे त्या प्रश्नावर स्थानिक जनतेत जागृती घडवून आणणे काम केलं. दारू चे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी शिबिरे त्यांनी घेतली. डॉक्टर अभय बंग यांच्या प्रयत्नांना यश आलं महाराष्ट्र शासनाने 1990  मध्ये गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी ची घोषणा केली. 

डॉक्टर अभय बंग यांच्या कार्याचा विविध संस्था व संघटनांनी गौरव केला आहे त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना भेटला आहे या शिवाय यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ग्रामीण विकास पारितोषिक, विदर्भ साहित्य संघ पुरस्कार, आदिशक्ती जीवनगौरव पुरस्कार  आणि अभय व राणी बंग यांना कपल ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला आहे. डॉक्टर साहेब आपल्या या कार्याला आमचा सलाम!

लेखन – त्रिवेद डुंबरे. कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा ही माहिती आपल्याला कशी वाटली आणि तुमच्या उपयोगी पडेल अशी माहिती आपल्या मराठी भाषेत वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

1 thought on “महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी दारूबंदीची मोहीम यशस्वी करणारे – डॉ. अभय बंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *