रसाळगड, infomarathi
- बातम्या, इन्फोमराठी, माहिती

रसाळगडाच्या कोठाराची भिंत ठासळली

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत खेड तालुक्यात उभ्या असल्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रसाळगड किल्ल्यावरील धान्य कोठाराची भिंत ढासळली आहे. हे धान्य कोठार किल्ल्यावरील शिवाच्या छोटेश्या मंदिराजवळ आहे.

पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाड्यांचे मोठ्या प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजावर अनेक तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आहे. हेच ते धान्य कोठार. 

या गडावर गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रुपयांचा  निधी संवर्धनाच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आलाय. मात्र तरीही गडाची अवस्था दयनीय झाली आहे. इतिहासाच्या पानांतील एक सुवर्णपान असलेला रसाळगड किल्ला शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षाचा बळी ठरला आहे. 

याच ठिकाणी इतिहासातील कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक भुईकोट गडकोट व जलदुर्ग उभे आहेत.  मात्र या किल्ल्यांना सरकारी दुर्लक्षाची ग्रहण लागले आहे. 

Written by Admin, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *