मूघल साम्राज्याच्या अवशेषांवर मराठ्यांनी आपल साम्राज्य निर्माण केल होत. मराठ्यांच त्यावेळी भारतावर वर्चस्व होत. अन हेच इंग्रजांच्या बुद्धीला पटत नव्हत. १७६१ मधील पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठ्यांचा इतका जबरदस्त पराभव झाला होता. की मराठी त्यातून आपली स्थिती कितपत सुधारू शकतील याबद्दल सर्वत्र साशंकता होती. पण सुदैवाने त्यांना माधवराव प्रथम सारखा कर्तबगार पेशव्यांची नेतृत्व मिळाले.
माधवरावांंनी आपल्या अल्प कारकिर्दीत हैदर अली व निजाम या दक्षिणेतील शत्रूंना चूप बसले बसवले.माधवरावांनी तोफखाण्याची, लष्कराची,गुप्तहेर खात्याची पुनर्बांधणी केली. एवढेच नव्हे तर दिल्ली जिंकून पानिपतपूर्व स्थिती निर्माण केली. पण माधवरावाच्या मृत्युनंतर मराठ्यांचे भाग्य चक्र वेगाने फिरू लागली. माधवराव ला अपत्य नसल्याने त्याचा लहान भाऊ नारायणगाव पेशवा बनला पण अल्पकालीन ठरला. पेशवा बनवायच्या आकांशा असल्याने रघुनाथरावाने नारायणरावाचा काटा काढला. अन तो स्वतः पेशवा बनला.
मराठ्यांना. हि गोष्ट पसंत पडली नाही. परिणामी रघुनाथरावला पेशवे पदावरुन काढून टाकले. राज्याची सत्ता आपल्याकडे घेतली. अशातच नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव जन्माला आल्याने त्याला ताबडतोब पेशवा बनविल्याने निराश झालेल्या रघुनाथरावांनी इंग्रजांचा आश्रय घेतला. घरातील भांडणामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. आणि ते राज्यहिताला अत्यंत बाधक ठरलं.
इंग्रजांनी रघुनाथरावला पेशवा बनवण्यास मदत करण्याचे कबूल केले. त्याबदली इंग्रजांच्या अटी मान्य करण्यास रघुनाथराव तयार झाला. यातूनच प्रथम इंग्रज मराठा युद्ध सुरु झालं. हे युद्ध सात वर्षे चालला १७७५ मध्ये सुरतच्या तहाने सुरू झालेले हे युद्ध १७८२ मध्ये सालबाईचा तह होऊन समाप्त झाले. रघुनाथरावांची महत्वकांशा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय लागला नाही. मात्र इंग्रज आणि मराठे दोघांची शक्ती परीक्षा या युद्धात झाली. इंग्रज पराभूत होऊनही त्यांना थोडाफार प्रदेश लाभ झाला त्यानंतर पुढील वीस वर्ष इंग्रज-मराठा आघाडीवर शांतताच राहिली.
Written by Admin, www.infomarathi.in