Velneshwar beach information in marathi
- इन्फोमराठी, भटकंती

निसर्ग वैभावाने नटलेला ‘वेळणेश्वर’ समुद्र किनारा

वेळणेश्वर या समुद्र काठच्या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. वेळणेश्वर येथील निसर्ग अगदी मनाला प्रसन्न करणारा आहे. येथील हिरवेगार झाड आणि पश्चिम घाटाच्या वळणामुळे लक्ष आकर्षीत करण्यासाठी वेळनेश्वर समुद्रकिनारा पुरेसा आहे. 

वेळनेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरीहून सुमारे १७० किमी दूर स्थित एक गाव आहे. येथील समुद्र तटामुळे या जागेचे नाव वेळनेश्वर पडले. मंदिर आणि समुद्र तट असलेले हे गाव स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे. येथील तट नारळाच्या झाडांनी भरलेले आहे. त्यात पाहणाऱ्यास समुद्राचा पाणी अत्यंत सुंदर आहे. गुहागर पर्यटन स्थळा मध्ये  वेळणेश्वर गावचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे. वेळणेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजेच या गावाचा इतिहास आहे. तीव्र उतारांचा वळनावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो.

सभोवताली नारळ – पोफळीच्या बागा , सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर वेगळेपण जाणवते. वेला म्हणजे समुद्र किनारा, त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर . येथील गावकऱ्यांच्या मते 12 व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास ” वेळोबा ” म्हणत.

सुमारे ४०० वर्षापूर्वी गाडगीळ नामक गृहस्थाने स्वखर्चाने आताचे मंदिर बांधले. मंदिर आवार प्रशस्त असुन त्यात २४ फुट उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर ओट्यावर चारही बाजूने एकमुख असणारा पितळी मुखवटा आणि त्यावर पाच फण्याचा पितळी नाग आहे. गाभाऱ्यात तीन फुट लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवटा ठेवून पोशाख घालतात. या शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीमागे कोनाड्यात पार्वती व गणपतीची मुर्ती आहे.

मंदिराचा आवार खूपच मोठा आहे. त्यामाधेय 9-10 मित्र उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच – तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे.

पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण मूर्ती आहेत. वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल, स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला ” मेरुमंडल “म्हणतात.

कसे जावे : गुहागर पासून राज्य परिवहन सेवा बसेस उपलब्ध आहेत. गुहागर पासून वेळणेश्वर २० किमी आहे. चिपळूण पासून वेळणेश्वर ५० किमी आहे. अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच!

Written by Admin, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *