कर्मवीर भाऊराव पाटील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांनी काही काळ सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचे कार्य केले होते. सन 1919 मध्ये सत्यशोधक समाजाच्या सातारा जिल्हा शाखेची एक परिषद काले या गावी भरविण्यात आली होती. भाऊराव पाटील हे देखील या परिषदेला उपस्थित होते.
या परिषदेच्या अखेरीस भाऊरावांनी सूचना केली की जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक संस्था स्थापन करावी. ही सूचना सर्वांनीच उचलून धरली त्यानुसार 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले येथेच रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. तिची जबाबदारी भाऊराव पाटील यांनी स्वीकारली. पुढे भाऊराव सातारा येथे वास्तव्यास गेले. त्यामुळे 1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे नेण्यात आले.
सन 1924 मध्ये कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वस्ती गृह सुरू केले. या वस्तीगृहात सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र रहात होते. भाऊराव पाटील स्वतः खेड्यापाड्यात फिरून बहुजन समाजातील गरीब हुशार विद्यार्थ्यांना गोळा करीत. त्यांना शिक्षणासाठी साताऱ्याला घेऊन येत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच राहण्याच्या जेवणाच्या सर्व जबाबदाऱ्या उचलीत.
भाऊ रावांनी इतकेच नव्हे तर आई-वडिलांपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली. वस्तीगृहातील विविध जातीधर्माच्या विद्यार्थ्यांचे ते खरेखुरे पालक होते. या विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी असे होते की त्यांना आधार मिळाला नसता तर त्यांच्या शिक्षणाची द्वारे कधीच बंद झाले असती. आपल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांयासाठी, त्यांनी शिक्षण चालू ठेवण्यासाठी अविश्रांत कष्ट उपसले.
उन्हापावसात वनवन फिरत मिळेल त्या ठिकाणी त्यांनी मदत गोळा केली. कर्मवीरांच्या कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा महत्त्वाचा वाटा होता. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणूनया माऊलीने आपले मंगळसूत्र विकण्यास ही मागेपुढे पाहिले नाही. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 1932 मध्ये त्यांनी पुणे येथे युनियन बोर्डिंग हाउसची स्थापना केली. त्याला गांधी आंबेडकर यांच्या मधील पुणे कराराच निमित्त होत.
युनियन बोर्डींग हाऊसच्या रूपाने कर्मवीरांनी एक प्रकारे पुणे करार स्मृती जतन करून ठेवली. 16 जुलै 1935 रोजी कर्मवीरांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी साताऱ्यात ते सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज सुरू केलं. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा व्याप वाढू लागला होता. 1937 वर्षापासून 1937 मध्ये देशात प्रांतिक कायदेमंडळांना साठी निवडणुका घेण्यात आलेल्या या निवडणुकीत मुंबईपर्यंतचा अनेक प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळ अधिकारावर आली.
मुंबई प्रांताच्या कॉंग्रेस सरकारने जनतेत साक्षरतेचा प्रसार करण्याची योजना सुरू केली. त्यानुसार खासगी शिक्षण संस्थांना प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच जाळेच निर्माण करण्याचे ठरवल. रयत शिक्षण संस्थेने पहील्या वर्षात 68प्राथमिक शाळा सुरू केल्या. तर त्याच्या पुढच्या वर्षी ही संख्या 168 वर गेली.
1949 साली संस्थेच्या वतीने सुरू केलेल्या प्राथमिक शाळांची संख्या 578 इतकी होती नंतरच्या काळात सरकारने प्राथमिक शाळा स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार महाराष्ट्रभर पसरलेल्या जवळपास 700 प्राथमिक शाळासंस्थेने महाराष्ट्र शासनास सुपूर्त केल्या. अशा पद्धतीने पाहता पाहता कर्मवीरांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची सुरूवात झाली.
Written by Admin, www.infomarathi.in