Water flowing from dam
- माहिती, इन्फोमराठी

धरणामधील पाण्याचे मोजमाप कसे केले जाते?

यावर्षी च्या पावसाळ्यात बहुतेक ठिकाणी पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुख्य शहरांना पाणी पुरवठा करणारी धरणे देखील भरली जात आहेत. मग धरणावर ताण येऊ नये म्हणून धरणांतून थोडं थोडं पाणी ही सोडले जातं. हे आपण बातम्यांमध्ये पाहतोच, पण बातम्यांमध्ये अजून एक गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे अमुक अमुक धरणामध्ये इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले.

पण पाणी मोजण्याचं एकक नेमकं काय आहे? आपणास तर फक्त “लिटर” म्हणजे काय ते माहित आहे; पण मग हे टीएमसी, क्यूसेक, क्युमेक हे काय आहे त्याचं प्रमाण काय आणि किती आहे ते पाहुयात.

वस्तूचे आकारमान काढण्यासाठी बहुतेकदा वापरली जाणारी पद्धत म्हणजे विस्थापन पद्धती. एखादी वस्तू द्रवात बुडवली असता, ती स्वत:च्या आकारमानाइतका द्रव बाजूला सारते. आíकमिडीजच्या या सिद्धान्ताचा उपयोग करून ज्या वस्तूचे आकारमान काढायचे आहे, अशी वस्तू द्रवाने भरलेल्या भांडय़ात पूर्ण बुडवतात.

त्या वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाचे आकारमान मोजतात. मात्र द्रवापेक्षा कमी घनता असलेल्या व घेतलेल्या द्रवात विरघळणाऱ्या पदार्थाचे आकारमान या पद्धतीने काढता येत नाही. विस्थापन पद्धतीने आकारमान मोजण्यासाठी उत्सारण पात्र किंवा मोजपात्र वापरतात. द्रव म्हणून बहुधा पाण्याचा उपयोग करतात. कारण पाणी सहज मिळते. आकारमानाचे MKS एकक घनमीटर (मीटर३ किंवा  M3 ) आहे. तर  CGS एकक घनसेंटीमीटर (सेंटीमीटर३ किंवा CM3) आहे.

घनसेंटिमीटर म्हणजे इंग्रजीत cubic centimeter, त्याचे संक्षिप्त रूप cc हे आहे. १ मीटर ३ = १०६ सेंटिमीटर ३= १०९ मिलिमीटर ३ द्रवपदार्थ भांडय़ाच्या आतील भागात ठेवले की ते भांडय़ाचा आतील आकार धारण करतात. एखाद्या पात्राचे (भांडय़ाचे) आतील आकारमान म्हणजेच त्या पात्राची धारणक्षमता. म्हणजेच त्या पात्रात जास्तीत जास्त किती द्रव ठेवता येईल, ती मात्रा. धारणक्षमतेचे MKS एकक आहे लिटर (L). याशिवाय बॅरेल (bbl), गॅलन (Ga) ही एककेही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलासंबंधीच्या वा इतर व्यवहारात वापरली जातात.

द्रवपदार्थाचे आकारमान मोजण्यासाठी मोजपात्राचा उपयोग करतात. शीतपेये २०० मिलिलिटर ते दीड लीटरच्या बाटल्यांमध्ये मिळतात. पाण्याची बाटली २०० मिलिलिटरपासून पाच लिटर, २० लिटपर्यंत उपलब्ध असते. यात ठेवलेला द्रवपदार्थ किती आहे, ते दर्शवलेले असते. अर्थात तो ठेवलेल्या बाटलीची धारणक्षमता त्यापेक्षा जरा जास्तच असते.

रवपदार्थाचे आकारमान मोजण्यासाठी मोजपात्राचा उपयोग करतात. शीतपेये २०० मिलिलिटर ते दीड लीटरच्या बाटल्यांमध्ये मिळतात. पाण्याची बाटली २०० मिलिलिटरपासून पाच लिटर, २० लिटपर्यंत उपलब्ध असते. यात ठेवलेला द्रवपदार्थ किती आहे, ते दर्शवलेले असते. अर्थात तो ठेवलेल्या बाटलीची धारणक्षमता त्यापेक्षा जरा जास्तच असते.

पाणी मोजण्याची एकके:

स्थिर पाणी मोजण्याची एकके:

  • १) लिटर 
  • २) घनफूट 
  • ३) घनमीटर  

धरणातील पाणी मोजण्याचे एकक:

टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट) एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट. या एका टी एम सी मध्ये जवळ जवळ २८, ३१६, ८४६, ५९२ लिटर पाणी असतं.

वाहते पाणी मोजण्याची एकके:

  • १ क्यूसेक (Cusec)– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात २८.३ लिटर पाणी बाहेर पडते. 
  • १ क्युमेक (Cumec) – एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात १,००० लिटर पाणी बाहेर पडते. 

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *