Sushma Swaraj Supermom
- बातम्या, इन्फोमराठी

भारतीय राजकारणातील सुपरमॉम सुषमा स्वराज

आपल्या अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. महिलांच्या आयडॉल असणाऱ्या स्वराज यांचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा प्रवास नुसताच संघर्षमय नसून थक्क करणारा असा आहे. स्वराज यांनी आपल्या चार दशकाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मान-सन्मान पटकावतानाच अनेक विक्रमही नोंदविले आहेत. 

हरयाणाच्या अंबाला छावणीमध्ये १४ जानेवारी १९५२मध्ये जन्मलेल्या स्वराज यांना त्यांच्या आजी-आजोबांनी दत्तक घेतलं होतं. सुषमा स्वराज किंवा चिंकू स्वराज यांचा जन्म हरियाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे हरदेव शर्मा आणि श्रीमती लक्ष्मी देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात स्थायिक झाले आहेत. स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले असून संस्कृत व राज्यशास्त्रातून पदवी प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला. 

त्यांनी चंदीगडमधून लॉची पदवी घेतली होती. कॉलेजमध्ये असतानाच त्यांची भेट स्वराज कौशल यांच्याशी झाली. १३ जुलै १९७५ मध्ये त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला. या दोघांनी सोबतच सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिसही सुरू केली होती. ७०च्या दशकात स्वराज या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाल्या. त्यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी नेते होते. ते जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय होते.

त्यामुळे १९७५मध्ये स्वराज या सुद्धा फर्नांडिस यांच्या आंदोलनाशी जोडल्या गेल्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभाग घेतला होता. आणीबाणी नंतर त्या जनता पार्टीत सहभागी झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलीही केली होती. २००९मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम पाहिलं. 

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी ५ वर्ष यशस्वीपणे केंद्रीय परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सुषमा स्वराज यांनी भारताची बाजू मांडली. संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरुन सुनावलेले खडे बोल असो किंवा सोशल मीडियावरुन भारतीय नागरिकांना एका केलेली मदत असतो. सुषमा स्वराज यांनी एक आदर्श मंत्री म्हणून आपली प्रतिमा तयार केली होती. सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली हळहळ व्यक्त केली आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं गेलं पाहिजे हे त्या बेधडक सांगत असल्याचं दिसत आहे. हिंसा करणाऱ्या पक्षांनीच धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला आहे. आम्हाला हिंदू असल्याचा गर्व आहे. त्यामुळेच आम्ही सांप्रदायिक आहोत. जोपर्यंत आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान असेल, तोपर्यंत आपण या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांसारखे होणार नाही. 

देशातली अनेक पक्ष हिंदूंना शिवीगाळ करण्यातच धन्यता मानतात. हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे. खरं तर सुषमा स्वराज यांनीही ३७० कलम हटवल्यानंतर अंतिम ट्विट केलं आहे. स्वराज यांनी कलम ३७० रद्द केल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. ‘प्रधानमंत्रीजी, तुमचं हार्दिक अभिनंदन. मी आयुष्यभर याच दिवसाची वाट पाहात होते,’ अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी काश्मीरमधून ३७० कलम काढून टाकल्याबद्दल मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. कलम ३७० काढून टाकणारं विधेयक राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही मंजूर झाल्यानंतर स्वराज यांनी त्यांच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या होत्या.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *