सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून अत्यंत आदराने गौरविले जात. त्यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य होते. ते खंबीर प्रशासक होते. कणखर धोरणांचा अवलंब करून ५६५ संस्थानांचे विलीनीकरण त्यांनी करून एकसंध भारत उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जाणुन घेउयात त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी
वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ झाला.
वल्लभभाई इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.
वल्लभभाई पटेल यांनी १९२८ मधील बार्डोली तालुक्यातील कर आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. येथून त्यांना “’सरदार”’ ही उपाधी मिळाली.
मिठाच्या सत्याग्रहात पकडले जाणारे ते एक प्रमुख राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कराची मधील कॉग्रेस अधिवेशनात गांधी-आयर्विन करार मांडला.
पटेल यांनी तीव्रपणे स्वातंत्र्यासाठी आवाज उठविल्याने ते जानेवारी १९३२ ते मे १९३३ पर्यंत गांधीजींसह १६ महिने येरवडा तुरुंगात राहिले होते.
सरदार पटेल यांनी महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून सन १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेतला होता.
सुप्रसिद्ध सोरटीसोमनाथ मंदिराचा जिर्नोधार केला. ते मंदिर सर्वांना खुले केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे उपपंतप्रधान झाले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इ. खात्यांची जबाबदारी होती.
www.infomarathi.in