Indian Flag
- इन्फोमराठी

यंदा जम्मू काश्मीर मध्ये देखील प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकणार राष्ट्रध्वज

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यातील वेगळी घटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकारने राज्यातील सगळ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सूचना पाठवल्या आहेत व १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज आपापल्या पंचायतींवर फडकवला जाईल याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असेही त्या आदेशात स्पष्ट करण्यात आल्याचे रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले.

Indian Flag in the sky
Copyrights: Google Images

काश्मीरमधील जनतेनेही आपापल्या घरांवर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज उभारला पाहिजे, असेही आवाहन रेड्डी यांनी केले आहे.रेड्डी म्हणाले की, तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. लोक घरांतून बाहेर पडत आहेत आणि कुठूनही कोणत्याही प्रकारच्या गडबड, गोंधळाचे वृत्त नाही. पाकिस्तानने आम्ही काहीही व कोणत्याही थराला जाऊन करायला तयार आहोत, असे उघडपणे त्यांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये म्हटलेले असल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले आहे.

श्रीनगर विमानतळावरून काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि माकपचे नेते सीताराम येचुरी यांना परत पाठवल्याबद्दल बोलताना रेड्डी यांनी सुरक्षा व्यवस्था नजरेसमोर ठेवून त्यांना परत पाठवले गेले. असेच पाऊल राज्याच्या पोलिसांनीही उचलले आहे, असे सांगितले.

मध्यंतरी म्हणजे २०१३ साली भारतीय राष्ट्रध्वजाचे महत्त्व जनसामान्यांमध्ये अधोरेखित करणे, ध्वजारोहणाबाबत नागरिकांना प्रोत्साहित करून, राष्ट्रध्वज संहितेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मंत्रालय, हायकोर्ट, आयुक्तांच्या कार्यालयांच्या धर्तीवर राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगर परिषदा, नगरपालिका, महापालिका, सरकारी महामंडळे, मंडळे, आयोगांच्या इमारतींवर वर्षभर राष्ट्रध्वज फडकाविण्यात यावा.

असा निर्णय राज्य सरकारने एका माहितीच्या अधिकारात मिळालेल्या उत्तरादाखल घेतला होता. संबंधित कार्यालयांनी इमारतीचा आकार, उंची, ठिकाण लक्षात घेऊन, इमारतींवर उंच, ठळक रित्या दिसेल अशा पद्धतीने राष्ट्रध्वज संहितेत नमूद केलेले अपवादात्मक प्रसंग वगळून वर्षाचे सर्व दिवस प्रमाणित आकाराचा राष्ट्रध्वज फडकाविण्याची काळजी घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयात म्हटलेले होते. या संबंधीत आचारसंहिता २००६ साली सादर केली.

संकलन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *