Lalbaugcha Raja History
- इन्फोमराठी

असं काय आहे लालबागचा गणपतीचं महत्त्व, काय आहे लालबाग च्या राजाची कथा?

लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांमध्ये समजूत रूढ आहे. लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.

त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली.

त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात ”श्री”ची स्थापना झाली. येथूनच ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली. दरवर्षी भक्तांची प्रचंड गर्दी जमत आहे. बाह्य सजावट काळानुसार बदलली असेल, परंतु विश्वासाचे तेच स्वरूप आजही कायम आहे. 

1934 Lalbaugcha Raja
1934 Lalbaugcha Raja

लालबागच्या दरबारात शोभणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९३४ मध्ये झाली. मुंबईत दादर आणि परळला लागून असलेला लालबाग परिसर. त्याकाळी मुंबईकरांचं उत्पन्नाचं साधन म्हणजे गिरण्या. या वेळी या परिसरात गिरणी कामगार, लहान मोठे दुकानदार आणि मच्छीमार या भागात राहत होते.

१९३२ मध्ये पेरू चाळ बंद झाल्याने मच्छीमार आणि दुकानदारांची कमाई थांबली होती, त्यांना उघड्यावर सामान विकायला भाग पाडले गेले. मग काही लोकांनी एकत्र येऊन नवस पूर्ण करण्यासाठी गणपतीचे पूजन करण्यास सुरवात केली. हळूहळू आसपासच्या लोकांनीही या पूजेला हजेरी लावायला सुरुवात केली आणि लालबागमधील बाजारपेठ वाढवण्यासाठी काही देणग्या देण्यास सुरूवात केली.

दोन वर्षांनंतर मच्छिमार आणि दुकानदारांचे नवस पूर्ण झाले, त्यांना बाजारपेठ तयार करण्यासाठी जमीन मिळाली. त्यानंतर त्यांनी १२ सप्टेंबर १९३४ रोजी देवावरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येथे गणपतीची मूर्ती स्थापन केली.

हळूहळू लालबागच्या या गणपतीच्या वैभवाची दूरदूरपर्यंत चर्चा होऊ लागली. येथे दर्शनासाठी मुंबईच्या विविध भागातून भाविकांची गर्दी झाली होती. मग लालबागच्या गणपतीला एक नवीन नाव आणि नवी ओळक मिळाली, ‘लालबाग चा राजा’ म्हणजेच लालबागचा राजा आणि अक्षरशः इथल्या गणपतीचा अभिमान कोणत्याही राजापेक्षा कमी नाही. मूर्ती पाहून बाप्पाचा तो रुबाब पाहायला मिळतोच.

१९३४ पासून आतापर्यंतच्या या सर्व शिल्पांमध्ये विशेष साम्य आहे. लालबागमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील शिल्पकारांनी हे बनवले आहेत. गेल्या आठ दशकांपासून परिसरातील कांबळी कुटुंब लालबागच्या राजाच्या मूर्ती बनवत आहे. सुमारे २० फूट उंच गणपतीची मूर्ती बनवण्याचे हे कौशल्य पिढ्यानपिढ्या पोहोचत आहे.

सध्या या कुटुंबातील तिसरी पिढी हे काम करीत आहे. कांबळी कुटुंबातील सर्वात वयस्क व्यक्ती म्हणजे ७३ वर्षांचे रत्नाकर कांबळी, ज्याने हे कौशल्य आपल्या वडिलांकडून शिकले. रत्नाकर कांबळीचे वडील महाराष्ट्रात भटकंती करताना शिल्पकला करायचे, पण एकदा लालबाग येथे पोचल्यावर ते येथेच राहिले. आज या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय लाल बाग चा राजाच्या दरबारची कल्पनाही करता येणार नाही.

१९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. इ.स. १९४८ ते इ.स. १९६८ या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. श्री सत्यनारायणाची महापूजा व पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो.

ही प्रथा आजतागायात चालू आहे. तसेच दर्शनोत्सुक भाविकांची व्यवस्था करण्यासाठी विविध मंडळाची जागरण पद्धत सुरु केली. त्याच कालावधीत विभागातील गणेशोत्सव मंडळाबरोबरच कुंभारवाडा, दुर्गादेवी, डंकनरोड, नवी अमृतवाडी, कामाठीपुरा, खेतवाडी या गणेशोत्सव मंडळांशी देखील जिव्हाळयाचे संबंध प्रस्थापित केले ते पुढे दृढ होत गेले व यापुढे आणखी दृढ होत जातील याबद्दल शंका नाही.

मंडळातर्फे व्याख्याने आयोजित केली जातात. ग्रंथालय उपक्रम राबविला जातो. तसेच नेत्र शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांसारखी शिबिरे आयोजित केली आहेत. नुकतंच पश्चिम महाराष्ट्रांमध्ये जी पूर परिस्थिती उद्भवली होती त्या साठी लालबाग च्या राजा कडून पूरग्रस्तांना २५ लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधी साठी देण्यात आली.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *