बघता बघता गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सगळीकडे नुसती लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठ, फुलबाजार फुलायला लागली आहे. पर्यावरण जपणारी मंडळे तसेच वर्गणी न घेणारी मंडळे नव्या संकल्पना मांडण्यात दंग झाली आहेत. अनेकांच्या घरामध्ये उत्साह तर शिगेला पोहचला आहे. गणेशाच्या आगमानपूर्वी घेतलेला हा वेध.
वाढत्या लोकसंख्याने या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांनी ह्याचा एक नवीन इव्हेंटच बनवला आहे. ह्या मुळे सगळीकडे उत्सव कमी आणि दिखावूपण जास्त चालू आहे. ह्यामुळे पर्यावरणाचा कोणी विचार करत नाही. मीच का काळजी घेऊ असे म्हणून सगळे जण हा विषय टाळतात. पण जर प्रत्येकाने ह्याचा गांभीर्याने विचार केला तर थोड्या प्रमाणात का होईना आपण प्रदूषण टाळू शकतो.
प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा शाडूची मूर्ती पूजन नंतर कुत्रीम तलावात विसर्जन करण ही काळाची गरज आहे. पारंपारिक शाडूच्या मूर्ती एवजी प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती वापर, तसेच सजावटीसाठी थरमोकॅल चा वापर, घातक रासायनिक रंगांचा वापर ह्यामुळें जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना आपल्याला पहायला मिळते.
हजारोंच्या वर पाण्यात न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्ती बघून खऱ्या गणेशभक्ताचे मन विषण्ण झाल्यावाचून राहत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर करायला हवा.
प्लास्टर ऑफ पॅरिस च्या तुलनेत मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहचवत नाही. तसेच इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात. तसेच इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे व प्राकृतिक असतात. ह्यामुळे कोणतीही हानी पोहचत नाही.
तसेच शाडूच्या मातीची मूर्ती तुम्ही घरीच बादलीमध्ये विसर्जित करू शकता. त्या नंतर ती विरघळलेली माती तुम्ही एकत्र करून जमा करून ठेवू शकता. बाप्पाची मूर्ती धातूची असेल तर ती तुम्ही कायमची घरात ठेवू शकता.
ह्यामुळे बाप्पाच्या मूर्ती ची विटंबना टळेल व पर्यावरण पण सुरक्षित राहील. शेवटी हा निर्णय तुमचा आहे. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि आमचे लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा.
लेखन – संकेत कोरडे, www.infomarathi.in