teachers day 2019
- इन्फोमराठी, माहिती

शिक्षक दिन का साजरा करतात?

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः
गुरुर साक्षात परब्रह्म:, तस्मै श्री गुरुवे नमः

याचा अर्थः गुरु ब्रह्मासारखा, गुरु विष्णूसारखा, गुरु म्हणजे महेश्वर म्हणजेच शिव. गुरु सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ परब्रह्मांसारखा आहे,आम्ही अशा गुरूला अभिवादन करतो.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांना आपल्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे.

dr sarvpalli

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. एकदा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांना विचारल की आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्यानंतर ते म्हणाले, “माझा वाढदिवस स्वतंत्रपणे साजरा करण्याऐवजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल.”

त्यानंतर दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी भारत सरकार देशभरातील उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कारही प्रदान करते.

कोणीतरी योग्य म्हटले आहे की शिक्षक पालकांपेक्षा मोठा असतो. पालक मुलास जन्म देतात, परंतु शिक्षक त्याच्या चारित्र्याला आकार देऊन उज्ज्वल भविष्य घडविन्याचे कार्य करतात. म्हणूनच आपण कितीही मोठे आणि यशस्वी झालो तरी आपण आपल्या शिक्षकांना विसरू नये.

शिक्षक हे आपले प्रेरणास्थान आहेत जे आपल्याला पुढे जाण्यास प्रवृत्त करतात. आयुष्यातील प्रत्येक अडथळ्याचा सामना करण्यास ते आपल्याला तयार करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *