Shahumaharaj infomarathi
- इतिहास, इन्फोमराठी

छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारा रयतहितदक्ष लोकराजा

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला.

शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता. समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.

त्यानी राधानगरी धरण बांधून शेतीविकासाला चालना दिली. शेतमाल खरेदी विक्रीसाठी त्यांनी मार्केट यार्ड तयार करून कोल्हापूरात एक बाजारपेठ निर्माण केली. राजर्षी शाहू महाराज यांनी १४ मे १८८५ रोजी गरीब शेतकर्यां च्या जनावरांवर मोफत इलाज केला जाईल, असा जाहीरनामा काढला.

गुर्हा ळघरामध्ये उसापासून रस काढताना चरकामध्ये शेतकर्यांवचे हात अडकत असत. त्यामुळे त्यांनी हात न सापडणारा चरक शोधण्यास मोठे बक्षीस जाहीर केले.

Shahu Maharaj

शाहू महाराजानी शेतकर्यांसाठी केलेली काही कामे पुढीलप्रमाने

१) शेणगाव (ता. भुदरगड) येथे झाडापासून ‘कात’ तयार करण्याचा कारखाना काढला.

२) शिरोळ व गडहिंग्लज येथे जिनिंग फॅक्टरी काढली.

३) पन्हाळा येथे चहा व कॉफीची शेती केली.

४)  गुळाची पेठ राजापुरात होती ती कोल्हापुरात निर्माण केली.

५) ‘शाहू मिल’ ही कापडाची गिरणी सुरू केली.

६) शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये “गोहत्या प्रतिबंधक कायदा” लागू केला.

शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी सगळ्याना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपतींचे वारसदार होते.

Written by Admin, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *