glowing beaches
- भटकंती, इन्फोमराठी

चमकता समुद्रकिनारा

आकाशभर पसरलेल चांदणे आणि त्यासोबतच खाली समुद्राच्या लाटांवर स्वार झालेले निळेशार चांदणे कधी पाहिले का?

मालदीव मध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यांपैकी वढू आयलंडचा समुद्र किनारा रात्रीच्या प्रकाशात चमकतो. हो अगदी बरोबर वाचताय तुम्ही रात्रीच्या वेळी आकाशात चंद्र अथवा चांदणे नसतानाही किनारा निळ्या रंगात चमकणारा असेल तर? ही कल्पना नाही तर वास्तव आहे. असा किनारा अनुभवायचा असेल तर मालदिवला जायला हवे.

५०० पेक्ष्या कमी लोकसंख्या असलेला वढू आयलंड आता जागतिक पर्यटन पातळीवर एक महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखल जातंय. बर्याच काळापासून ही बेट मालदीव्सची सर्वात गुप्त रहस्ये होती, येथील वढू आयलंड चा किनारा हे स्वप्नातील दृष्य प्रत्यक्षात आणतो.

मालदिवची राजधानी माले पासून जवळच असलेला हा किनारा रात्री निळ्याशार रंगाने नुसता झगमगत असतो. किनार्या वर एकही दिवा नसला तरी हा निळा प्रकाश असतोच असतो. ही प्रकाशाची निळी जादू दाखविणार्यान या किनार्याला म्हणूनच ओशन ऑफ स्टार्स म्हणून ओळखले जाते.

येथे जणू आकाशातील तारेच समुद्राच्या पाण्यात उतरले आहेत असा भास होतो. मालदीवमध्ये आता भेट देणारी ही सर्वात मागणीची ठिकाणे बनली आहे.

chamkta samudra infomarathi

या निळ्या प्रकाशमयी जादूमागचे रहस्य आहे ते या पाण्यात असणारे अगदी छोटया वनस्पतींसारखे दिसणारे एक प्रकारचे जीवाणू त्यांना फायटोप्लांकटन असे नांव आहे. दिवसा हे जीव समुद्राच्या पाण्यावर येतात आणि सूर्यप्रकाश शोषून घेतात. रात्र पडली की हे जीवाणू तो प्रकाश नीळ्या रंगात बाहेर टाकतात. प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या प्रजाती मूळे हे घडून येते.

जगातील सर्वात सुंदर नॅचरल लाईट हे जीव बाहेर टाकतात. आणि हे दृष्य पाहण्यासाठी दोन डोळे पुरे पडत नाहीत. हि एक नैसर्गिक प्रक्रिया असून ह्याला ‘बायोल्यूमाइन्सेंस’ म्हणून ओळखल्या जातं, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या प्रजाती मूळे हे घडून येते. आणि ह्या प्रजाती मुळेच समुद्र किनारा सुंदर अश्या निळ्या रंगामध्ये उजळून निघतो.

असंख्य पर्यटक आणि विशेषतः नवविवाहित दाम्पत्य हनीमून साजरा करण्यासाठी ह्या ठिकाणी येत असतात. ५०० पेक्ष्या कमी लोकसंख्या असलेला वढू आयलंड आता जागतिक पर्यटन पातळीवर एक महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखल जातंय.

या ठिकाणी जाण्यासाठी दिल्ली येथून थेट विमानसेवाही आहे. किनार्यावर हॉटेल्स आहेत. निसर्गाचा हा अदभुत सोहळा पाहणे नक्कीच एक पर्वणी आहे. असा किनारा अनुभवायचा असेल तर मालदिवला जायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *