father of indian navy infomarathi
- शिवाजी महाराज, इन्फोमराठी

फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचा जनक’ म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण आणि गोव्यात समुद्राच्या संरक्षणासाठी नौदलाची स्थापन केली. शिवाजी महाराजांना हा भाग अरब, पोर्तुगीज, ब्रिटीश आणि समुद्री चाच्यांपासून वाचवायचा होता. त्यासाठी भिवंडी, कल्याण आणि पनवेलमध्ये त्यानी लढाईसाठी जहाजे तयार केली.

छत्रपती शिवाजी महाराजांकड़े तब्बल 400 ते 500 जहाजे होती? ही जहाजे 1657-58 पासून बांधली गेल्याचा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकड़े जहाजांवर प्रशिक्षित लोकांना कामावर ठेवलेले होते.

त्यांच्या कारकिर्दीत अंदाजे 20 लढाऊ जहाजे बांधली गेली असे सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किनारपट्टीवर सिद्दीसोबत अनेक लढाया लढल्या.

शिवाजी महाराजांच्या कारभाराखाली असलेले कृष्णाजी अनंत सभासद यांनी असे लिहिले आहे की शिवाजी महाराजांच्या ताफ्यात दोन पथके होते. प्रत्येक स्क्वाड्रनकडे 200 जहाजे होती. आणि ती सर्व वेगवेगळ्या वर्गातील होती. शिवाजी महाराजांचे चिटनीस असलेले मल्हारराव चिटणीस यांच्या म्हणण्यानुसार ही संख्या अंदाजे 400 ते 500 होती.

इंग्रजी कारखान्याच्या नोंदीनुसार, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 85 फ्रिगेट्स अर्थात लहान लढाऊ जहाज आणि तीन मोठी जहाजे होती.. दर्यासारंग या ताफ्याचे प्रमुख होते.

आजची मॉडर्न इंडियन नेव्ही त्याच मराठ्यांच्या नेव्हीचा एक भाग मानली जाते जी मराठ्यांनी स्थापन केली आणि नंतर शिवाजी महाराजांनी ती वाढविली. या कारणास्तव शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचा पिता’ म्हटले जाते.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फोल्लो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *