deepa malik
- खेळ, इन्फोमराठी

दीपा मलिक राजीव गांधी खेल रत्न प्राप्त करणारी पहिली महिला पॅरा अ‍ॅथलीट

पॅरालंपिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला पॅरा अ‍ॅथलीट ठरली. २०१६ च्या रिओ पॅरालंपिकमध्ये दीपाने एफ – ५३ मध्ये रौप्य पदक जिंकले. त्यांना आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पूनिया यांच्यासह संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते.

दीपाच्या पायाना अर्धांगवायू झाला आहे. त्या सैन्याच्या अधिकार्यांची पत्नी आणि दोन मुलांची आई आहे.  काही  वर्षांपूर्वी पाठीच्या मणक्यात ट्यूमर झाल्यामुळे त्याना चालणे ही अशक्य होते. त्यानंतर दीपा यांचे १ ऑपरेशन केले गेले.

ज्यासाठी त्याच्या कमरेला आणि पायात १३३ टाके लावले गेले. पाठीचा कणा सुधारण्यासाठी त्याच्यावर 31 शस्त्रक्रिया झाल्या आहे. आतापर्यंत दीपा यांनी भाला फेकणे, पोहण्यात भाग घेतला. त्यानी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जलतरण पदक जिंकले आहे.

दीपा मलिक यांची कारकीर्द:

२००९ मध्ये दीपाने पहिले पदक (कांस्य) जिंकले. पुढच्या वर्षी इतके आश्चर्यकारक कामगिरी केली की इंग्लंडमधील शॉटपुट, डिस्कस थ्रो आणि जेव्हलीन तिन्ही गटात सुवर्णपदक जिंकले. आणि चीनमधील पॅरा एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले. तिथे कांस्य जिंकणारी दीपा ही पहिली भारतीय महिला ठरली.

दीपाने २०११ मध्ये वर्ल्ड अ‍ॅथलीट चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले. २०१४  बीजिंगमध्ये चीन ओपन  अ‍ॅथलीटस्पर्धेत शॉटपुटमध्ये सुवर्णपदक जिंकले.

भालाफेक गेममध्ये त्यानी आशियाई विक्रम नोंदविला आहे. आतापर्यंत त्यानी आंतरराष्ट्रीय खेळात १८ पदके जिंकली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *