School bus 1
- माहिती, इन्फोमराठी

स्कूल बसचा रंग पिवळा का असतो ?

बर्याचदा आपण पाहिले असेल की कोणत्याही स्कूल बसमध्ये आपल्या शाळेचे नाव लिहिलेले असते परंतु बसचा रंग हा पिवळा असतो. आपण कधी त्याबद्दल विचार केला आहे? प्रत्येक स्कूल बसचा रंग नेहमीच पिवळा ठेवला जातो आणि त्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत जी मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. चला तर जाणुन घेउयात काय आहे याचे कारण.

१ अपघाताची शक्यता कमी होते.

School bus 2
infomarathi.in

पिवळा हा एक रंग आहे जो दूरवरुन दिसतो आणि पिवळी स्कूल बस पाऊस, दिवस आणि रात्र आणि धुक्यासारख्या परिस्थितीत सहज दिसू शकते, ज्यामुळे अपघाताची शक्यता कमी होते.

२ घोडा गाडीचा वापर केला गेला

School bus 3
infomarathi.in

उत्तर अमेरिकेत १९व्या शतकात सर्वात आधी स्कूल बस वापरण्यास सुरूवात केली गेली. पण त्याकाळी मोटार गाडी नसल्याने शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी घोडा गाडीचा वापर केला जायचा.

३ आधी केशरी आणि पिवळा रंग वापरला जायचा

school bus 4
infomarathi.in

२०व्या शतकाच्या सुरूवातीला गाडी म्हणून घोडा गाडी ऐवजी मोटार गाड्यांचा वापर सुरू झाला. लाकूड आणि धातूपासून ही गाडी तयार केलेली असायची. तर केशरी किंवा पिवळा रंग या गाड्यांना दिलेला असायचा. जेणेकरून या गाड्यांमध्ये वेगळ्या दिसून याव्यात.

४ पिवळा रंग का वापरला गेला

school bus 5
infomarathi.in

१९३० मध्ये अमेरिकेत एक संशोधन केले गेले, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की पिवळा रंग प्रथम आपल्या डोळ्यांना दिसतो. याचे कारण असे आहे की पिवळा रंग इतरांपेक्षा १.२४ पट जास्त आकर्षण आहे जे आपल्या डोळ्यांना प्रथम आकर्षित करते.

५ अपघाताची संभावना टाळल्या जाऊ शकतात

school bus 6
infomarathi.in

पिवळ्या रंगाची स्कुल बस दुरून दिसल्यानंतर समोरील वाहनचालक सतर्क होऊन, अधिक काळजीपूर्वक गाडी चालवतात आणि होणाऱ्या अपघाताची संभावना टाळल्या जाऊ शकतात. या सर्व कारणांसाठी स्कूल बसचा रंग पिवळा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून प्रत्येक शक्य स्तरावर मुलांचे संरक्षण केले जाऊ शकते.

 ६ स्कूल बसच्या पुढे आणि मागे ‘School Bus’ स्पष्ट उल्लेख असावा

school bus 7
infomarathi.in

स्कूल बसेससंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अनेक दिशा-निर्देश देखील जारी केले आहे. त्यानुसार, खाजगी स्कूल बसेसचा रंग पिवळाच असावा. त्यासोबतच स्कूल बसच्या पुढे आणि मागे ‘School Bus’ असा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.

७ पिवळा रंग पावसात, रात्रीही स्पष्ट दिसतो

school bus 8
infomarathi.in

सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसला पिवळा रंग हा दिला जातो. बस पिवळा रंग असल्याने दूरूनही स्पष्ट दिसू शकते. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची बस पावसात, रात्रीही स्पष्ट दिसते. त्यामुळे दुर्घटना होण्याचा धोकाही कमी असतो.

आम्हाला खात्री आहे की स्कूल बसचा रंग पिवळा का असतो? याची ही माहिती आपल्याला आवडली असेल. आणि ती आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *