बर्याचदा पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही आकाशात इंद्रधनुष्य पाहिले असेल. इंद्रधनुष्य का दिसते? या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊया इंद्रधनुष्य कसे आणि का दिसते.
आपल्याला पांढरा दिसणारा सूर्यप्रकाश खरतर सात वेगवेगळ्या रंगांनी बनलेला असतो जो प्रिझमच्या मदतीने दिसू शकतो. इंद्रधनुष्य हा निसर्गाचा प्रिझम असतो.
पाण्याचे लहान थेंब जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा प्रिझमसारखे कार्य करतात. सूर्यप्रकाश सात वेगवेगळ्या रंगात परवार्तित होतो आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. जेव्हा सूर्य मागे असेल आणि पाऊस पुढे असेल तेव्हा आपण इंद्रधनुष्य पाहू शकतो.
तसेच इंद्रधनुष्य हे मोठ्या धबधब्यांजवळ, आणि झऱ्यांजवळ दिसतात. बऱ्याच वेळा इंद्रधनुष्य हे पहाटेच्या वेळी पश्चिमेकडे आणि संध्याकाळी पूर्वेस दिसते.
संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असे म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसते. प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल “इंद्रवज्रच” असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो.
पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते.
इंद्रधनुष्यात दिसणारे रंग जांभळे, निळे, हिरवे, पिवळे, केशरी आणि लाल हे आहेत जे एका विशिष्ट क्रमाने दिसतात.
आम्हाला खात्री आहे की इंद्रधनुष्य का दिसते ? याची ही माहिती आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.