kolkata police white uniform
- बातम्या, इन्फोमराठी, माहिती

कोलकाता पोलीस खाकी ऐवजी सफेद वर्दी का घालतात ?

खाकी वर्दी ही पोलिसांची ओळख आहे. आपण नेहमी पोलिसांना खाकी रंगाच्या ड्रेसमध्ये पाहिले असेलच कारण तो पोलिसांचा गणवेश आहे. पण जर तुम्ही कोलकाताला गेला असाल तर तुम्ही पाहिलेच असेल की तिथले पोलिस खाकी कलर च्याऐवजी पांढरा वर्दी घालतात. तुमच्या मनात आले असेल की संपूर्ण देशात पोलिसांना खाकी वर्दी आहे. तर कोलकाता पोलिसांचा गणवेश पांढरा का आहे त्यामागे एक खास कारण आहे. चला तर जाणुन घेऊयात काय कारण आहे या मागे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते तेव्हा ब्रिटिशांनी आपल्या देशात सन १८४५ मध्ये ब्रिटीश कोलकाता पोलिस बनवले. त्यावेळी कोलकाताच्या पोलिस गणवेशाचा रंग ठेवावा, असा विचार केला गेला आणि मग तेथील पोलिसांचा गणवेश पांढरा होईल, असा निर्णय घेण्यात आला.

kolkata police white dress
millenniumpost

यामागे एक कारण होते ते म्हणजे कोलाकात्यातील हवामान खरं तर, कोलकाता समुद्राजवळ असल्याने, वातावरणात नेहमीच आर्द्रता असते आणि उष्णता खूप तीव्र असते. यामुळे पोलिसांच्या गणवेशासाठी पांढरा रंग निवडला गेला जेणेकरून उन्हातील चमकदार किरण पांढर्याव रंगापासून प्रतिबिंबित होतील आणि जास्त उष्णता होणार नाही. तेव्हापासून तेथील पोलिस पांढरे गणवेष परिधान करत आहेत.

कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. कोलकाताच्या पोलिस वर्दीचा रंग सफ़ेद आहे आणि संपूर्ण बंगालमधील पोलिस खाकी रंगाचा गणवेश परिधान करतात.

आम्ही आशा करतो की कोलकाता पोलीस खाकी ऐवजी सफेद वर्दी का घालतात ? ही माहिती आपल्याला आवडली असेल अशीच रंजक माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *