jayban canon information in marathi
- इतिहास, इन्फोमराठी, संभाजीराजे

आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ? जी एकदाच चालविण्यात आली तलावच बनला

जयगड किल्ल्यावर ठेवलेली जयबाण ही तोफ आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ मानली जाते. या तोफेची चाचणी म्हणून फक्त एकदाच चालविण्यात आली. तेव्हा शहरापासून ३५  कि.मी. अंतरावर असलेल्या गावात तलावच निर्माण झाला अस इथले काही जूने लोक आज ही सांगतात. तो तलाव आजही गावातल्या लोकांची तहान भागवत आहे. अरावलीच्या टेकड्यांवर बांधलेला जयगड किल्ला १७२६ मध्ये बांधण्यात आला होता.

jayban canon pic 1

जयगड किल्ला १८ व्या शतकात महाराजा जयसिंगने बांधला होता आणि हा भव्य किल्ला जयपूरमधील अरावली टेकड्यांवर वसलेला आहे. विद्याधर नावाच्या आर्किटेक्टने या किल्ल्याचे डिझाइन केले होते. आणि हा किल्ला जयपूर शहराच्या समृद्ध संस्कृतीला प्रतिबिंबित करण्यासाठी बनविला गेला होता. या किल्ल्याच्या उंचीमुळे संपूर्ण जयपूर शहर तिथून बघायला मिळते.

jayban canon pic 2

जयगड किल्ल्याच्या डूंगर दरवाजावर जगातील सर्वात मोठी तोफ ठेवण्यात आली आहे. तोफची लांबी ३१ फूट आहे. जयबान तोफ प्रथम चाचणी करण्यात आली तेव्हा जयपूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर चाकसू नावाच्या गावात पडल्यामुळे तलावाची निर्मिती झाली. या तोफचे अंदाजे वजन ५० टन आहे. या तोफात ८ मीटर लांबीची बॅरल्स ठेवण्याची सुविधा आहे. जगभरात आढळणाऱ्या तोफांपैकी ही सर्वात मोठी तोफ आहे. जास्त वजन असल्यामुळे या तोफेला कधी किल्ल्याबाहेर काढले गेले नाही किंवा युद्धातही वापरण्यात आले नाही.

jayban canon pic 3

जयपूरच्या किल्ल्याच्या कारखान्यात ही तोफ बनविण्यात आली होती. या कारखान्यातच आणखी तोफांची निर्मिती झाली. या तोफांची विजयादशमीला विशेष पूजा केली जाते. जयपूरच्या जयगड किल्ल्यात ही तोफ अजूनही संरक्षित आहे आणि लाखो पर्यटक ते पाहण्यासाठी येथे येतात. ही जगातील सर्वात प्रसिद्ध तोफ आहे.

jayban canon pic 4

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

1 thought on “आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ? जी एकदाच चालविण्यात आली तलावच बनला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *