balaji mandir
- इन्फोमराठी

तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास

तिरुपती बालाजी मंदिर दक्षिण भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये अधिक प्रसिद्ध मंदिर आहे, तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशच्या तिरुमालामध्ये आहे. तिरुपती बालाजी यांना व्यंकटेश्वर, श्रीनिवास आणि गोविंदा म्हणूनही ओळखले जाते. तिरुमालामध्ये हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. प्रत्येक वर्गातील लोक बालाजीला पाहण्यासाठी येथे येतात. प्रत्येकजण येथे दर्शनाला  येतो. या मंदिराविषयी अनेक मान्यता आहेत. ज्यामुळे ते इतके प्रसिद्ध आहे.

तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. मंदिर अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात.

संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळ्यातही थंडावा असतो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740 किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात.

 हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी कोट्यवधी रुपये दान केले जातात. वेंकटेश्वराच्या दर्शनासाठी दररोज 50 हजार ते 1 लाख भाविक येत असतात, तर खास प्रसंगी यात्रेकरूंची संख्या 5 लाखांपर्यंत जाते.

वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तिरुपती बालाजी मंदिराला भूलोकातील  वैकुंठ म्हणूनही ओळखले जाते, म्हणजेच  पृथ्वीवरील विष्णूंचे निवासस्थान आहे. ‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’ बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो.   

हे मंदिर “सात टेकड्यांचे मंदिर” म्हणून ओळखले जाते. तामिळ साहित्यात तिरुपतीला त्रिवंगम म्हटले जाते. या मंदिराला दोन हजार वर्षांचा इतिहास असून चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. बालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. 

पुढे कधी काळी या मंदिराची देखभाल मराठा सेनापती राघोजी भोसले यांनी केल्याची नोंद आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि या देवस्थानचे एक नाते आजही आंध्र प्रदेशात सांगितले जाते. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.

तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. तिथल्या भाषेत याला “मोक्कू” म्हणतात रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते.

प्रसादाच्या रूपात तिरुपतीमध्ये लाडू दिला जातो . या लाडूचे वजन 175 ग्रॅम आहे. तिरुपती लाडूला जीआय टॅग मिळतो, म्हणजेच असे लाडू फक्त तिरुमला तिरुपती देवस्थानच बनवू शकतात.

तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे. आज तिरुपती हे अत्यंत विकसित शहर आहे आणि ते बस आणि ट्रेनच्या माध्यमातून भारतातील मोठ्या  शहरांशी जोडलेले  आहे. या शहराकडे जाण्यासाठी चेन्नई आणि हैदराबाद येथून बरेच चांगले रस्ते बनविण्यात आले आहेत.तिरुपतीपासून तिरुमाला डोंगरांकडे जाणारा संपूर्ण मार्ग, बस आणि कारमधून प्रवास करणार्यासाठी बनवलेला  आहे

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *