shooj durgandhi
- इन्फोमराठी

शूज घातल्यानंतर पायांना येणारी दुर्गंधी अशी घालवा.

शूज घातल्यानंतर तुमच्या पायांना इतकी दुर्गंधी येते की शूज काढल्यानंतर सगळे जण तुमच्यापासून दूर पळतात. शरीरावर अत्तर लावून वास काढून टाकू शकता परंतु पायासाठी परफ्यूम येत नाही तर आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपचार सांगत आहोत ज्यामुळे आपण काही मिनिटांत पायांपासून दुर्गंधी दूर करू शकता.

पायापासून गंध येणे ही एक सामान्य समस्या आहे.त्यास ब्राह्मी हायड्रोसिल असे म्हणतात. जास्त वेळ  शूजचा वापर केल्याने पायांना घाम येतो ज्यामुळे ते दुर्गंधित होतात. यावर मात करण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर वापरू शकता. आपल्या शूज पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर वास रोखण्यासाठी थोडासा बेकिंग पावडर घाला, आपल्या शूजचा वास निघून गेला असल्याचे आपल्याला आढळेल.

चहाच्या पिशव्या शूजमध्ये ठेवा – आपल्या शूजांचा वास काढून टाकण्यासाठी चहाच्या पिशव्या आपल्या शूजमध्ये ठेवू शकता, यामुळे आपल्या शूजांचा वास दूर होईल. घामामुळे शूजमध्ये बॅक्टेरिया अधिक वाढतात त्यामुळे शूज शक्य असल्यास सुकवून घ्या किंवा आठवड्यातून एकदा तरी उन्हात ठेवा.

रात्री झोपताना अगोदर पाय स्वच्छ धुवून घ्या आणि पायमोजे पायांत घालून घ्या. कांद्याच्या छोट्या छोट्या चकत्या करुन त्या पायमोज्यांत घालून दुर्गंध येत असलेल्या भागाजवळ ठेवून झोपा. दुर्गंधी येणार नाही. सकाळी-संध्याकाळी पाय स्वच्छ पाण्याने धुवून काढा. वेळो-वेळी पायाला स्क्रब करा. त्यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि घामाचा दुर्गंध दूर होईल.

सफरचंद व्हिनेगर देखील उपयुक्त ठरू शकते – सफरचंद व्हिनेगर थोड्या गरम पाण्यात घाला आणि त्यामध्ये आपले पाय थोडावेळ भिजवा. आपल्या पायांचा वास निघून जाईल. लिंबू किंवा संत्र्याची सालही शूजमध्ये ठेवल्यास दुर्गंधी खूप कमी होते.

घामामुळे शूजमध्ये बॅक्टेरिया अधिक वाढतात त्यामुळे शूज शक्य असल्यास सुकवून घ्या किंवा आठवड्यातून एकदा तरी उन्हात ठेवा. आले (अद्रक) पाण्यात अर्धा तास उकळून घ्या. या पाण्यामध्ये अर्धी बादली थंड पाणी टाका. अर्धा तास या पाण्यात पाय बुडवून ठेवा. पाय मऊ होऊन पायाची दुर्गंधी सुद्धा नाहीशी होते.

साबण वापरा – आपले पाय साबणाने दिवसातून दोनदा धुवा, आपल्याला काही दिवसात आपल्या पायांचा वास कमी होत असल्याचे आढळेल. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *