prachin kulup vihir
- इन्फोमराठी

बदलापूर मधील कुलुपाच्या खाचेच्या आकाराची प्राचीन विहीर

बदलापूर येथे असलेली कुलुपाच्या खाचेच्या ( Key Hole) आकाराची विहीर आहे. बदलापूर रेल्वस्थानकापासून ६ किमी अंतरावर असलेल्या देवळोली या गावात ही विहीर असून, ही पेशवेकालीन असल्याचं सांगितलं जातं. ही विहीर पाहिले बाजीराव यांच्या काळात त्यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांनी बांधून घेतली असावी. त्यावेळी पुण्याहून वसईला जाताना मध्ये पाण्याची टंचाई भासू नये म्हणून या विहिरीचं बांधकाम करून घेण्यात आले असा अंदाज आहे.

या विहिरीचा आकार एखाद्या कुलुपाच्या खाचेप्रमाणे आहे. या विहिरीचे बांधकाम पूर्णपणे दगडाचे आहे. विहिरीत उतरण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत. विहिरीत उतरताना दोन्ही बाजूला दिवे लावण्याच्या देवळ्या सुद्धा आहेत. तसेच दोन्ही बाजूला मस्तक नसलेले शरभ आहेत.

विहिरीच्या दरवाज्यावर गणपतीची सुरेख मूर्ती आहे, आणि गणपतीच्या दोन्ही बाजुला दोन मूर्ती आहेत त्या अंगरक्षकांच्या असाव्यात. दरवाजाच्या चौकटीवर कमळाची चिन्ह आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या अगदी वर दोन शरभांची मस्तक विहिरीच्या विरुद्ध दिशेला तोंड करून आहेत.

ही विहीर अजूनही चांगल्या स्थितीत आहे. ही विहीर पूर्ण दगडी चिऱ्यात बांधलेली आहे. यआ विहिरीला बाजूने पाहिले की शंकराच्या पिंडी सारखा त्याचा आकार दिसतो अन जर टॉप अँगल ने पाहिले तर कुलपात चावी टाकण्याच्या आकारासारखा दिसतो.

३० ते ३५ फूट खाली अश्या खोली नंतर या विहिरीचे पाणी लागते. खाली उतरताना अंदाजे २२ दगडी पायऱ्या लागतात. एकावर एक असे दगड रचून ही विहीर उभारली आहे. खाली उतरताना दोन कोनाडे दिसतात, बहुतेक दिवे लावण्यासाठी त्याचा उपयोग करत असावे.

विहिरीच्या आतल्या बाजूस द्वाराच्या कमानीवर गणपती व इतर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतील. त्याच्याच खाली फुले कोरलेली आहेत. या बांधकामात कुठेही चुन्याचा वापर केला गेला नाही. दगडावर दगड कोरून बसवले आहेत. विहीरीत दोन कोनाडे आहेत, बहुतेक दिवे लावण्यासाठी आहेत. विहीरीला बारा महिने पाणी असते.

कसे जायचे – बदलापूर पश्चिमेस स्टेशनहून बदलापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जायचे. पुढे गावात पोहोचल्यावर देवळोली गांव अथवा चवीची विहीर विचारल्यास. गावकरी रस्ता दाखवतात. थेट विहिरीपर्यंत गाडी रस्ता आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *