मुंबई बघायला येणारा कुणीही पर्यटक असो गेट वे ऑफ इंडिया पाहिल्याशिवाय त्याच मुंबई दर्शन पूर्ण होत नाही. ब्रिटीश शासन काळात १९११ मध्ये या जागेची पायाभरणी केली गेली ती पंचम जॉर्ज आणि त्याची राणी मेरी भारत भेटीवर येणार त्यांचे स्वागत करण्यासाठी या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली.
१९१४ साली या गेटच्या डिझाईनला भारत सरकारने मान्यता दिली. १९२० साली हे काम पूर्ण झाले आणि ४ डिसेम्बर १९२४ ला त्याचे उद्घाटन केले गेले. जॉर्ज विटेट यांनी या गेटचे डिझाईन बनविले होते. गेट वे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे प्रवेशद्वार. या गेटच्या बांधकामासाठी त्यावेळी २१ लाख रुपये खर्च आला होता.
गेटच्या मधला घुमट १५ मीटर म्हणजे साधारण ४८ फुटी असून त्याची जमिनीपासूनची उंची आहे २६ मीटर म्हणजे साधारण ८ फुट. याला चार गेट आहेत. याचे उद्घाटन तत्कालीन व्हॉइसरॉय अर्ल ऑफ रीडिंग यांनी केले होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेवटचे ब्रिटिश सैन्य जहाज गेट वे ऑफ इंडियामधून परत गेले. गेटवेच्या समुद्राकडील बाजूला पायऱ्या आहेत आणि तेथून घारापुरी लेणी साठी बोटी सुटतात. गेटवे समोर शिवाजीराजे आणि विवेकानंद यांचे पुतळे नंतर उभारले गेले. याच्या एका बाजूला प्रसिद्ध ताजमहाल हॉटेल आहे.
ही भव्य-दिव्य वास्तू पहिल्या नंतर येथून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या. गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात.
आपण वर्षाच्या कोणत्याही वेळी येथे येऊ शकता. गेटवे ऑफ इंडिया या स्मारकाला आपण कधीही कोणत्याही दिवशी अन कोणत्याही वेळी भेट देऊ शकतो. पण भेट देण्याचा उत्तम काळ जर विचाराल तर तो आहे नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांमधला, कारण या वेळी पावसाळ्या नंतरचे मोहक वातावरण तेथे अनुभवायला मिळते.
कसे पोहोचाल – मुंबईला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, छत्रपती शिवाजी विमानतळ आणि सांताक्रूझ डोमेस्टिक विमानतळ असे तीन विमानतळ आहेत. आपल्या सोयीनुसार आपण कोणत्याही विमानतळावर उतरू शकता आणि तेथून गेट वे ऑफ इंडियासाठी टॅक्सी घेऊ शकता.
पुणे आणि नाशिकहून जाण्यासाठी आणि बसेसची सुविधा आहे. मग येथून टॅक्सीद्वारे आपण गेट वे ऑफ इंडियाला पोहोचू शकता. मध्य, पूर्व आणि पश्चिम भारताच्या गाड्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनवर येतात. तिथूनच डायरेक्ट गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकता.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.