sambhaji maharaj yesubai rajaramraje
- इन्फोमराठी

संभाजी महाराजांच्या सोबत येसूबाई आणि राजाराम महाराजांना देखील कैद केलं होतं का?

सध्या झी मराठी वाहिनी वर सुरू असलेली स्वराज्य रक्षक संभाजी मालिका निरोप घेत आहे. पण या मालिकेने आणि मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग नुकताच चित्रित केला आहे. पण बऱ्याच प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रबखान ने पकडल्या नंतर येसूबाई, ताराबाई, राजाराम महाराज यांचं पुढे काय झालं.

औरंगजेब ने १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश ह्यांना तुळापुर येथे बंदी बनवून ४० दिवस हाल करून हत्या केली. छत्रपतींना पकडल्या नंतर औरंगजेबाची पापी नजर फिरली ती रायगडाच्या दिशेने. त्याने रायगडा भोवतीचे फासे आवळण्यास व वेढा घालण्यास सुरुवात केली.

औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. रायगडावर छत्रपतींच राज घरा येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले. हीच संधी, सुवर्ण संधी ठरवण्याच्या हेतूने औरंगजेबाने शहाबुद्धीन खानाला जुल्फिकार खानच्या मदतीस धाडले. स्वराज्यावर धावून येणारे संकट पाहून माणकोजी पांढरे सारखे कर्मदरिद्री मराठे मोघलाना शामिल झाले.

आई जगदंबा मदतीस धावून आली. मोघलांचा व कपटी देशद्रोह्यांचा काळा डाव हेरखात्याने हेरला व तत्काळ रायगडच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावातील जिवाजी नाईक सर्कले व गोदाजी जगताप ह्या दोन सरदारांना सांगितला. स्वराज्यावर चालून येणारे संकट आणि त्याचे परीणाम लक्षात घेत हे दोन्ही वीर सोबत असलेले ९ मावळे  घेऊन मोगलांना रोखण्यास तयार झाले.

वाऱ्याच्या वेगाने व सिंहाच्या छातीने सारे सह्याद्री चे वीर खिंडीच्या दिशेने धावु लागले व बघता बघता कोकण दिवा किल्ल्याजवळच्या खिंडीच्या तोंडाशी येऊन ठाकले. प्रत्येकाने आपल्या आपल्या हल्ल्याच्या जागा हेरल्या. 

मराठमोळ्या गोफणी शत्रू सैन्यावर बरसण्यास तैयार झाल्या. आणि जिवाच्या आकांताने सर्व मराठे खानाला रोखण्यासाठी सज्ज झाले. मराठ्यांचा तो आवेश पाहून मोघली सैन्य माघार घेऊन पळू लागले. पराक्रमाची शर्थे झाली. मोघलांच्या वाढीव तुकड्या जुल्फिकार खानाच्या फौजेला मिळण्यात असमर्थ झाल्या. मोघलांचा हा डाव गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक तसेच त्या नऊ योध्यांनी हाणून पडला आणि इतिहासात अजरामर झाले.

जर या लढाईत गोदाजी जगताप व जीवाजी नाईक यांनी खिंड रोखून धरली नसती तर इतिहास वेगळाच घडला असता. कदाचित महाराणी येसूबाई व संभाजी पुत्र शाहू राजेंबरोबरच छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई हे दोघेही मोंगलांच्या कैदेत गेले असते व मराठ्यांचे स्वराज्य १६८९ रोजीच नष्ट झाले असते. आपल्याला हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

1 thought on “संभाजी महाराजांच्या सोबत येसूबाई आणि राजाराम महाराजांना देखील कैद केलं होतं का?

  1. अतिशय उपयुक्त माहिती. अशीच मनोरंजक व ज्ञानात भर पाडणारी माहिती मिळत राहो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *