railwaystation samudra sapatipasunchi unchi
- इन्फोमराठी

रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या बोर्ड वर समुद्र सपाटी पासूनची उंची का लिहिलेली असते?

आपल्यापैकी सर्वांनी नक्कीच कधीतरी ट्रेनचा प्रवास केला असेल किंवा कोणा न कोणाला तरी भेटायला म्हणून रेल्वे स्टेशनला भेट दिली असेल. आपण कधी पाहिले आहे की रेल्वे स्टेशनवर एक बोर्ड आहे ज्यावर रेल्वे स्टेशनचे नाव आणि समुद्रसपाटीपासून उंची (Mean Sea Level, MSL) जसे की ३०० मीटर, ५० मीटर इत्यादी लिहिलेली आहेत.

रेल्वे स्टेशन बोर्डावर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिली गेली आहे, याचा अर्थ काय आहे, हे प्रवाशांच्या माहितीसाठी लिहिलेले आहे किंवा दुसरे काही कारण आहे का असा विचार कधी केला आहे का? चला या लेखाद्वारे आज आपण जाणून घेऊया MSL म्हणजे च Mean Sea Level.

सर्व प्रथम, Mean Sea Level म्हणजे काय याचा अभ्यास करूया. जसे आपल्याला माहित आहे की पृथ्वी गोल आहे, परंतु तिचा पृष्ठभाग दबावामुळे किंवा ज्वालामुखीच्या कारणांमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग एक समान किंवा सपाट नाही. काही ठिकाणी मोकळं पठार आहे, काही ठिकाणी छोट्या छोट्या टेकड्या असतात काही ठिकाणी मोठे डोंगर किंवा पर्वत असतात. म्हणूनच, जगाला पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन मोजण्यासाठी, एक बिंदू आवश्यक होता जो नेहमी सारखाच असायला हवा होता आणि समुद्रापेक्षाही उत्तम साधन काही नव्हते.

असेही म्हटले जाऊ शकते की जगाची समान उंची मोजण्यासाठी शास्त्रज्ञांना एक बिंदू आवश्यक आहे जो तोच राहील. यासाठी, समुद्र हा एक उत्तम पर्याय आहे आणि MSL च्या मदतीने उंचीची गणना करणे खूप सोपे आहे. हे देखील कारण समुद्र पातळी किंवा समुद्राचे पाणी सर्वत्र सारखेच आहे. इमारतीच्या किंवा जागेची उंची मोजण्यासाठी बहुधा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये MSL चा वापर केला जातो.

MSL मुळे ड्रायव्हर आणि गार्डला माहिती देण्यासाठी हे रेल्वे बोर्डावर लिहिणे आवश्यक आहे. म्हणजेच समजा ट्रेन २५० मीटर समुद्रसपाटीपासून १०० मीटर समुद्रसपाटीच्या उंचीवरून जात आहे. अशा परिस्थितीत माहिती फलक बघून ड्रायव्हर इंजिनचा वेग कसा वाढवायचा किंवा उतारावर ब्रेक्स चा वापर कसा आणि किती करायचा याचा अंदाज बांधतो.

याशिवाय रेल्वेच्या वरच्या विद्युत तारांना उंची देण्यासही मदत होते. जेणेकरुन विद्युत तारा नेहमीच रेल्वेच्या तारांना स्पर्श करत राहतात, म्हणजेच, विद्युत तारांशी कनेक्शन टिकवून ठेवण्यास मदत होते.

तर आपणास हे समजले असेलच की भारतीय रेल्वे स्टेशन बोर्डावर ‘समुद्र सपाटी पासूनची उंची’ किंवा Mean Sea Level, MSL का लिहिलेले आहे आणि त्याचा अर्थ काय आहे? अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *