jagannathpuri mandir
- इतिहास

जगन्नाथपुरी मंदिराची आपल्याला माहिती नसलेली रहस्य

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांची रचना व बांधकाम शैली आजही अचंबीत करणारी आहे. असेच एक मंदिर ओडीसा राज्यात आहे. भारताच्या पूर्व दिशेला ओडीसा राज्याची राजधानी भुवनेश्वर या जवळ जगन्नाथपुरी मंदिर आहे.

जगन्नाथ पुरीचे मंदिर श्रीविष्णूचे आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाला व त्याच्या भावंडाना समर्पित आहे. हिंदुधर्मातील चार प्रमुख तिर्थक्षेत्रांपैकी एक असल्याने दरवर्षी जगभरातून हजारो भाविकभक्त जगन्नाथपुरी येथे दर्शनाला जातात.

या मंदिराचा परिसर 4,00,000 चौरस फुटात (37000 मीटर) इतका पसरलेला आहे. कलिंग शैलीतील या मंदिराला चारही बाजूनी भिंतीची तटबंदी केलेली आहे. या मंदिराचा मुख्य कळस 214 फूट म्हणजे 65 मीटर उंच आहे. या कळसावर श्री कृष्णाचे सुदर्शनचक्र बसवलेले आहे.

या चक्राला निलचक्र असेही म्हणले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातून कोणत्याही भागातून या मंदिराकडे पाहिल्यास ते चक्र समोर असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे 900 वर्षापूर्वी हे अष्टधातूंचे अवाढव्य चक्र इतक्या उंचावर कसे बसवले असेल हे कोडेच आहे.

या मंदिराचे अजून एक आश्चर्य म्हणजे या मंदिरावरील ध्वज हा नेहमी वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकतो. यासाठी मंदिराच्या बांधकाम शैलीच्या आधारे वेगवेगळे तर्क लावले जातात परंतु मंदिराचा झेंडा वाऱ्याच्या उलट्या दिशेने कसा फडकू शकतो याचे पक्के कारण कोणालाही सांगता आले नाही.

जगभरात कोणत्याही समुद्रकिनारी वाहणाऱ्या हवेची ठरलेली दिशा असते. साधारणतः दिवसा समुद्राकडून जमिनीकडे हवा येते तर रात्रीच्या वेळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वारे वहाते. पण या मंदिर परिसरातील भौगोलिक रचना अशा प्रकारची आहे की इथे दिवसा जमिनीकडून समुद्राकडे व रात्री समुद्राकडून जमिनीकडे असे उलट दिशेने वारे वहाते.

मंदिर समुद्र किनारी असल्याने त्या परिसरात समुद्राच्या आवाज पसरलेला आहे परंतु मंदिराच्या द्वारातून आत प्रवेश करताच बाहेरचा आवाज पूर्ण लोप पावतो. तुम्ही मंदिराच्या बाहेर पाय ठेवला की पुन्हा तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज कानात येऊ लागतो. हे कशामुळे घडते हे सांगणे कठीण आहे.

येथे निघणारी भव्य रथयात्रा जगभरात प्रसिद्ध आहेच पण याव्यतिरिक्त असे अनेक रहस्य आहेत ज्याचे कोडे अजूनही सुटलेले नाही. या मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकात इसवी सन 1112 दरम्यान झाल्याचे सांगितले जाते. 900 वर्षांपूर्वी इतके भव्य व आश्चर्यकारक वास्तू उभी करताना वापरले गेलेलं तंत्रज्ञान हे आज चकित करते.

आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्याला हि माहिती कशी वाटली. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *