alok khismatrao psi
- इन्फोमराठी

दोनदा बारावी नापास ते MPSC टॉपर, PSI आलोक यांचा प्रेरणादायी प्रवास.

कित्येक जणांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असते. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करत असतात. परंतु हाताची बोटे मोजण्याएवढे लोक ती यशस्वीरीत्या उत्तीर्ण करतात. 

आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट बघणार आहोत जे बारावी परीक्षा दोनदा नापास झाले, पण आपल्या जिद्दीच्या जोरावर आज ते पी. एस. आय. आहेत. चला तर म पाहुयात MPSC Topper आलोक खिसमतराव यांच्या थक्क करणारा प्रवास.

अभ्यासात हुशार असल्याने आलोक खिसमतराव यांनी दहावीला चांगले गुण संपादन केले. त्यानंतर आई वडिलांच्या इच्छेपोटी चांगले गुण मिळाल्यामुळे त्यांनी सायन्स फिल्ड ला ऍडमिशन घेतले.

परंतु त्यांना सायन्स या विषयामध्ये फारसा काही रस नव्हता आणि त्यामुळे त्यांचे अभ्यासात दुर्लक्ष होत गेले. कॉलेज ला न जाणे, घरीच सारखं झोपून राहणे असा क्रम त्यांचा चालूच राहिला. परिणामी त्यांना बारावीच्या परीक्षेस अपयशाला सामोरे जावे लागले.

मुलगा बारावी परीक्षा नापास झाला आहे हे ऐकून त्यांच्या आई वडिलांना धक्काच बसला. पहिली ते दहावी पहिल्या क्रमांक पटकावलेला मुलगा बारावी नापास कसा झाला?

त्यांच्या आई वडिलांना नातेवाईकांनी बारावीचा निकाल विचारू नये आणि त्यांना आणखी त्रास होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः सगळ्यांना फोन करून ते नापास झाल्याची बातमी कळवली. त्यांनी पुन्हा बारावीची परीक्षा दिली ते पुन्हा त्यामध्ये नापास झाले.

परंतु तिसरा अटेम्प्ट देताना त्यांनी खूप मेहनत केली आणि जिद्दीच्या जोरावर ५५% गन संपादन करून ते बारावी ची परीक्षा उत्तीर्ण झाले. बारावी दोनदा नापास होऊन पास झाल्याने त्यांची शिकण्याची इच्छा मरून गेली होती.

तरीदेखील त्यांनी आई वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी बी. ए. ला ऍडमिशन घेतले. या काळामध्ये त्यांनी एका दुकानांमध्ये काम देखील केले. ढकलत ढकलत कसे बसे त्यांनी बी. ए. पास केले आणि सुटकेचा श्वास घेतला.

नंतर त्यांनी एक दुकान उघडण्याचे धाडस केले आणि त्यासाठी त्यांनी लोन देखील घेतले. पण इथे देखील त्यांना अपयशच आले. ३-४ महिन्यानंतर दुकान बंद करण्याची वेळ आली. आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती पण या काळात देखील परिवाराने त्यांची साथ सोडली नाही.

एकदा वर्तमानपत्रात MPSC ची जाहिरात पाहिली आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं कि बस्स आता आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचंच. त्यासाठी त्यांनी विद्देचे माहेरघर असलेले पुणे हे ठिकाण निवडले. ८ बाय ६ च्या छोट्या रूम मध्ये दिवसरात्र एक करून त्यांनी अभ्यास केला.

खूप कठीण परिस्थितीना सामोरे जात त्यांनी प्री आणि मेन्स परीक्षा उत्तीर्ण केली. मैदानी चाचणी करत असताना त्यांना पायाला दुखापत झाली. परंतु तरी देखील त्यांनी १०० पैकी १०० गुण त्यांनी मिळवले. जागतिक महिला दिनी त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर हि पोस्ट मिळवली आणि सर्वाना दाखवून दिले कि आलोक खिसमतराव कोण आहे.

आपल्याला आलोक खिसमतराव यांचा प्रवास आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. अश्याच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमचे पेज फोल्लो करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *