अधिकारी म्हटलं तर सर्वात आधी आपल्याला आठवत ते म्हणजे त्यांच्याकडे असेल निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा त्यांच्या अवतीभोवती असणारी लोकांची वर्दळ, गाड्यांचा ताफा इत्यादी परंतु त्यांनी हे यश मिळवण्यासाठी घेतलेलं कष्ट याचा बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच आठवतात.
आज आपण अश्याच एका अधिकाऱ्याची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी वयाच्या फक्त २३ व्या वर्षी अधिकारी होऊन त्यांचीच नव्हे तर सर्वांचीच मान उंचावली आहे. चला तर जाणून घेऊयात सध्या आई. ए. एस म्हणून कार्यरत असणाऱ्या स्नेहल धायगुडे यांच्या कठोर पण तितकाच आपल्याला खूप काही शिकवून जाणारा प्रवास.
स्नेहल धायगुडे यांच्या घरची परिस्थिती तशी फारशी काही चांगली नव्हती. आई शेतकरी आणि बाबा पोलीस कॉन्स्टेबल जरी असले तरी सख्या चुलत भावांची जबाबदारी त्यांच्यावर होती.
कुटुंबाची जबाबदारी पेलणे कठीण जात असून देखील तरीसुद्धा स्नेहल यांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. याची जाणीव स्नेहल यांना होती. मुलगा मुलगी एकसामान या विचारांचे असल्याने त्यांनी कुठल्याच प्रकारचा भेदभाव शिक्षण किंवा इतर बाबींमध्ये स्नेहल यांच्यासोबत कधी केला नाही.
स्नेहल यांच्या हॉस्टेल ला खर्च देखील त्यांना पेलणे अवघड जात होते. स्नेहल यांनी १२वीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर ऍग्रीकल्चर हा विषय निवडायचा आहे असे त्यांनी बाबांना विचारले. तेव्हा इतर लोक त्यांच्या बाबांना ऍग्रीकल्चर करून काय मुलगी शेती करणार आहे का? असे सांगू लागले.
तेव्हादेखील त्यांच्या बाबांनी स्नेहल यांना सहकार्य केले. ज्या वयात मुलंमुली मौजमस्ती करण्यात व्यस्त असतात त्या वयात त्यांनी कॉलेज मध्ये असतानाच त्यांनी यु पी एस सी या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली.
त्यांना इंग्रजी बोलणे थोडस कठीण जाऊ लागले इतर काही गोष्टी देखील त्यांना अवघड जाऊ लागल्या पण त्यावर देखील त्यांनी हळू हळू मात केली. त्यांनी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयन्त सुरु केले. सातत्याने त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला.
उत्स्फुर्त लोकांसोबत त्यांनी राहायला सुरुवात केली निगेटिव्ह विचार त्यांनी सोडून दिले. नंतर पुढे परीक्षेचे एक एक टप्पे पार करत त्यांचा अंतिम निकाल आला आणि त्या अधिकारी झाल्या होत्या. घरच्यांना प्रचंड आनंद झाला. फक्त जिद्दीच्या आणि दृढ निश्चाच्यांच्या जोरावर त्यांना हे यश प्राप्त झाले.
आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपली पसंती दर्शवा आणि सर्वात महत्वाचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सामान्य मुलीचा असामान्य असा प्रवास वयाच्या २३ व्या वर्षी बनल्या स्नेहल धायगुडे अधिकारी हा माहितीपर लेख पोहचवा.
जेणेकरून त्यांनादेखील या माहितीचा फायदा होईल. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.