jalalelya bhandyanvaril daag
- इन्फोमराठी

जळालेल्या भांड्यावरील डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स

कधी कधी स्वयंपाक करताना दुसर काही काम मध्येच आडव येत आणि आपल्याकडून गॅस बंद करायचं राहून जात. आणि त्या भांड्यातील भाजी जळून जाते. त्यामुळे भांडे खराब होऊन जात अशा वेळी नेमक काय केल्याने आपल भांडे परत पहिल्यासारख करता येऊ शकत हे आपल्याला आज आम्ही सांगणार आहोत.

सर्वप्रथम जळालेल्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा, दोन चमचे लिंबाचा रस आणि दीड कप गरम पाणी घाला. दहा मिनिटे राहूद्या. त्यांनतर घासनीच्या साहय्याने भांड्याची आतली बाजू हलक्या हाताने घासा. असे केल्याने आपले जळालेले भांडे परत पहिल्यासारख पूर्णपणे साफ होईल. 

जळलेले भांडी साफ करण्याचा अजून एक सोपा उपाय यासाठी आपण एक लिंबू घ्या. ते मधोमध कापून जळलेल्या भांड्यावर घसरा  नंतर त्या भांड्यात गरम पाणी टाका दहा मिनिटे तसेच राहूद्या. नंतर हलक्या हाताने घासणी फिरवली तरी सुद्धा आपले भांडे साफ होईल.

अल्युमिनियमच्या जळालेल्या तव्याला साफ करण्यासाठी एक कांदा किसून त्याच्यावर टाका. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून उकळून घ्या. त्यानंतर त्या तव्यावर हलक्या हाताने घासणी फिरवा. तवा साफ होईल.

जळालेले भांडे साफ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा हि वापर करू शकता यासाठी 2 चमचे व्हिनेगर जळालेल्या भांड्यात टाका. थोड्यावेळाने त्यामध्ये थोडे गरम पाणी आणि भांडी घासायचे लिक्विड मिसळून ते भांडे घासून घ्या.  असे केल्याने जळालेले भांडे परत पूर्वी सारखे दिसू लागेल.

जळालेल्या भांड्यात थोडासा टोमॅटोचा रस आणि पाणी मिसळा. दहा मिनिटे राहूद्या आता ते हलक्या हाताने चोळुन स्वच्छ करा. असे केल्याने जळलेली भांडी सहज साफ होऊ शकतात.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपली पसंती दर्शवा आणि सर्वात महत्वाचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जळालेल्या भांड्यावरील डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स हा माहितीपर लेख पोहचवा.

जेणेकरून त्यांनादेखील या माहितीचा फायदा होईल. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *