swayapakgharatil farshivarche daag
- इन्फोमराठी

स्वयंपाकघरामधील फरशीवर पडणारे तेलकट डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स

स्वयंपाकघरातील फरशीवर बऱ्याचदा तेल सांडल्यामुळे, भाजी सांडल्यामुळे डाग पडतात. जेवण बनवताना तेल, भाजी आणि मलाल्याचे हात नकळत टाईल्सवर लागतात आणि डाग पडतात. फरशीवर पडणारे तेलकट डाग घालवण्यासाठी या काही सोप्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

फरशीवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी 2 चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून जाडसर पेस्ट बनवून फरशीवर पडलेल्या डागावर लावा. साधारण 15 मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर ओल्या कपड्याने ती जागा स्वच्छ करू शकता.

फरशीवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी थोडेसे विनेगार कपड्यावर घ्या. आणि त्या कपड्याने फरशीवर ज्या ठिकाणी डाग पडलेत त्या ठिकाणी पुसून घ्या 15 मिनिटे राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपली फरशी चकचकीत दिसू लागेल.

फरशीवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी 2 चमचे लिंबाचा रस घ्या त्यामध्ये थोडेसे दही मिसळून फरशीवरील तेलकट डागावर लावा. साधारणपणे 10 ते 15 मिनिटे राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपली फरशी चकचकीत दिसू लागेल.

फरशीवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी चमचाभर डीटरजेंट पावडर पाण्यात मिसळा त्यामध्ये अर्धा कप व्हाइट व्हिनेगर मिसळा त्यांतर त्या पाण्याने फरशी पुसून घ्या.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपली पसंती दर्शवा आणि सर्वात महत्वाचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वयंपाकघरामधील फरशीवर पडणारे तेलकट डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स हा माहितीपर लेख पोहचवा. जेणेकरून त्यांनादेखील या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *