dadhi vadhavanysathi sopya tips
- इन्फोमराठी

दाढी दाट करण्यासाठी सोप्या टिप्स

अलीकडच्या काळात दाढी ही ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनू लागले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा ट्रेंड कमालीचा वाढलाय. तरूणांमध्ये लांब आणि दाट दाढीचे बराच ट्रेंड आहे. आणि म्हणूनच लोकांच्या दाढीच्या स्टाइल वेगवेगळ्या आहेत.

परंतु काही लोकांकडे खूपच हलकी आणि छोटी दाढी असते ज्यामुळे स्टाईलिश दाढी ठेवण्याची इच्छा असून ही काही करता येत नाही. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत दाढी दाट करण्यासाठी सोप्या टिप्स

दाढीसाठी आवळा तेल एक अतिशय प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला दाढी दाट बनवायची असेल तर दररोज झोपण्याआधी आवळा तेलाने आपल्या दाढीची 10 मिनिटे मालिश करा. असे केल्याने दाढी दाट होण्यास मदत मिळेल.

दाढी दाट करण्यासाठी नारळ तेल खूप उपयुक्त आहे. यासाठी कढीपत्याची काही पाने नारळाच्या तेलासोबत उकळा आणि थंड झाल्यावर त्या तेलाने आपल्या दाढीची मालिश करा. ह्या तेलाने नियमित मालिश केल्याने आपल्या दाढीचे केस दाट होण्यासाठी मदत होईल.

दाढी दाट करण्यासाठी दालचिनीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळा आणि त्यापासून तयार केलेली पेस्ट आपल्या दाढीवर 15 मिनिटे लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा उपाय केल्याने आपली दाढी दाट होण्यासाठी मदत होईल.

मोहरीची पाने दाढी वाढविण्यासाठी आणि दाट होण्यासाठी देखील उपयुक्त असतात. यासाठी आवळा तेलात मोहरीची पाने मिक्स करून घ्या आणि अशी तयार केलेली पेस्ट आपल्या दाढीवर लावा 20 मिनिटे राहूद्या आणि नंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय केल्याने तुमची दाढी दाट होण्यासाठी मदत होईल

जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 1, बी 6 आणि बी 12 पुरेसे असेल तर दाढीचे केस जाड येतात. म्हणून, आपल्या आहारात जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

नीलगिरी किंवा तीळ तेलात नीलगिरीच्या तेलाचे 15 ते 30 थेंब तुमच्या चेहऱ्यावर लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हे नियमित केल्याने दाढीचे केस मऊ होतील आणि खाज सुटण्यापासूनही मुक्त होईल.

आपला आहार आपल्या दाढीच्या केसांच्या जाड आणि मजबूत केसांना देखील योगदान देतो, म्हणून नेहमी संतुलित आहार घ्या ज्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि पोष्टिक घटक असतात.

ताणतणाव देखील आपल्या केसांना नुकसान करतात, म्हणून नेहमी आरामशीर राहा. पुरेशी झोप न घेतल्यामुळे आपले केस ही खराब होतात, त्यामुळे रात्री 6 ते 8 तास झोप घ्या.

मुबलक पाणी प्या. आहारात संतुलित जेवणाचा समावेश करा. व्यसनापासून दूर रहा. मानसिक ताण असल्यास दाढीची वाढ लवकर होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ‘रिलॅक्स’ राहण्याचा प्रयत्न करा.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपली पसंती दर्शवा आणि सर्वात महत्वाचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत दाढी दाट करण्यासाठी सोप्या टिप्स हा माहितीपर लेख पोहचवा. जेणेकरून त्यांनादेखील या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *