kharbhuj fal khanyache fayde
- आरोग्य

खरबूज खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी या दिवसात खरबूज हे फळ आपण खाऊ शकता. खरबूजाचा रंग पिकल्यानंतर पिवळा असतो.

खरबूजामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिज असतात. खरबूज खाल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. चला तर जाणुन घेउयात खरबूज खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

खरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज खाल्याने शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्यास मदत होते. खरबूज पचायला हलके असल्याने खरबूज खाल्याने अपचन होत नाही.

ज्यांना डायबेटीसचा त्रास आहे ते पण काही प्रमाणात खरबूज खाऊ शकतात कारण खरबूजामध्ये  पाण्याचे प्रमाण 95% असते. आणि साखर मात्र 5% इतकी असते. खरबुजामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. खरबूज खाल्याने चेहरा निरोगी राहतो.

नियमितपणे खरबूज खाल्ल्याने शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यात आढळणारे पौष्टिक घटक अनेक प्रकारच्या आजारांशी लढायला मदत करतात.

खरबुजामध्ये एंडीनोसीन नावाचे तत्त्व असते. जे शरीरात रक्ताची गुठळया  होऊ देत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याच्या नियमित खरबुजाचे सेवन केल्याने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.

खरबुजाचे नियमित सेवन किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. नियमितपणे खरबूज खाणार्यान माणसाच्या डोळ्यातील मोतीबिंदुचा धोका जवळजवळ चाळीस टक्क्यांनी कमी होतो.

वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या  रोजच्या आहारात खरबुजाचा समावेश अवश्य करा कारण खरबुजामध्ये कॅलरी कमी प्रमाणात आढळतात, तर फायबर जास्त असते. खरबुज खाल्ल्याने पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *