keli khanayche fayde
- आरोग्य

केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

केळी हे संपूर्ण जगभरात आवडीने खाल्ले जाणारे फळ आहे. केळी हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे केळी वर्षभर बाजारात उपलब्ध असते. केळी पोषक घटक युक्त फळ आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशिअम, फायबर, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी असते. आज आपण जाणून घेणार आहोत केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

नियमितपणे केळीचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता हळूहळू कमी होते. नियमितपणे केळी खाल्याने हाडे मजबूत होतात. म्हणून लहान मुलांच्या हाडांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांना नियमित केळी खायला दिली पाहिजे.

नियमितपणे केळी खाल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. केळी पचायला हलकी असते. ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास आहे. त्यांनी रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधासोबत एक मध्यम आकाराची केळी खाल्यास सकाळी मलनिस्सारण व्यवस्थित होईल.

भाजल्यावर त्याठिकाणी चांगली पिकलेली केळी लावा. असे केल्याने वेदना कमी होण्यास  मदत होईल. आपले दात पिवळसर दिसत असतील तर केळीची साल आपल्या दातावर थोडावेळ घासल्याने दात पांढरे दिसू लागतात.

तोंडाला आतून फोड आले असल्यास एक मध्यम आकाराची केळी गाईच्या दुधाबरोबर खा.  तोंडाला आतून आलेले फोड बरे होण्यास मदत होईल. आपल्या चेहऱ्यावर मुरूम असतील तर आपण केळीची साल आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी मुरूम आहेत त्या ठिकाणी हलक्या हाताने घासा. असे केल्याने चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत मिळेल.

आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर एक पिकलेली केळी मॅश करून चेहऱ्यावर चोळा. काही वेळ राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.

पायांच्या भेगा घालवण्यासाठी एक पिकलेली केळी कुस्करून आपल्या पायांच्या भेगावर लावा. तासभर राहूद्या त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुऊन टाका. असे केल्याने पायांच्या भेगा कमी होतील.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. 

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *