bhakari khanyache fayde
- आरोग्य

ज्वारीची भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ज्वारीची भाकरी म्हणल की आठवत गरम गरम भाकरी आणि खरडा. ज्वारीची भाकरी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. ज्वारीच्या भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते.

शहरी भागामध्ये भाकरी खाण्याचे प्रमाण फार कमी आहे. ज्वारीच्या भाकरीमधून आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असे पोषक घटक मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी कमीत कमी दिवसातून एक वेळ तरी खाणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. चला तर मग जाणून घेऊया ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे.

ज्वारीच्या भाकरीच्या सेवनाने आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. ज्वारीच्या भाकरीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते. ग्रामीण भागामध्ये ज्वारीची भाकरी खाण्याला प्राधान्य दिले जाते ते याच कारणामुळे आपण हि आपल्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश अवश्य करा.

चपाती पचायला जड असते. त्यामुळे जेवणामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी ज्वारीची भाकरी खावी. ज्वारीच्या भाकरीमध्ये लोहाचे प्रमाण असते. त्यामुळे ऍनिमिया ग्रस्त रुग्णांनी ज्वारीच्या भाकरीचे सेवन केल्यास फायदा होतो.

ज्वारी भाकरी रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे आपण  ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समावेश करा.

अनावश्यक वजन वाढणे, लठ्ठपणा या समस्या शहरांबरोबर ग्रामीण भागांमध्येही मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. लठ्ठपणा वाढल्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो.

त्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण मिळवायचे असेल तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य द्या. यामुळे तुमच्या शरीराला पोषक घटक मिळतील. त्यासोबतच लठ्ठपणा वाढणार नाही. आपल्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्याने आपण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता.

ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे यास आळा बसतो. ज्वारीच्या भाकरीचा समावेश जेवणामध्ये केल्यास अशा प्रकारच्या अनेक आजारांना तुम्ही तोंड देऊ शकाल. ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *