akrod khanyache fayde
- आरोग्य

बुद्धिवर्धक अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे

अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉंस्फरस, हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात जे आपल्या शरीर स्वास्थासाठी खूप महत्वाचे असतात. ब्रेन फूड म्हणून ओळखला जाणारा अक्रोड बुद्धिवर्धक देखील आहे. यातून शरीराला भरपूर प्रमाणात पोषक घटक मिळतात. आज आपण जाणून घेणार आहोत अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

दिवसातून दोन तीन अक्रोड खाण्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. अपचन सारख्या पोटाच्या अनेक समस्या नियंत्रणात रहातात. अक्रोड खाल्याने पचनशक्ती सुरळीत होते तसेच अक्रोड वजन कमी करण्यास फायदेशीर आहे.

कामाच्या तणावामुळे बऱ्याचवेळा आपण नैराश्याने ग्रस्त होतो. डोक्यातील टेन्शनमुळे आपण निर्णयक्षमता हरवून बसतो. अक्रोडच्या नित्य सेवनामुळे अशी वेळ येत नाही. अक्रोड सेवन केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते बुद्धीला अधिक चालना मिळते. स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची असेल तर अक्रोडचे सेवन अवश्य करा.

अक्रोडमधील भरपूर प्रमाणात आढळणारे प्रोटीन व व्हिटॅमिन ई हे आपल्या त्वचा व केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत. यासाठी अक्रोडच्या तेलाचा वापर केस व त्वचेसाठी करू शकता.

अक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते जे आपल्या हाडांना व दातांना मजबूत करण्यास मदत करते. दात दुखत असतील तर अक्रोडची पाने चावल्याने वेदना कमी होतात.

अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी ऍसिड चे प्रमाण अधिक असते जे आपल्या हृदयाचे आरोग्य सदृढ ठेवते. याने वजन नियंत्रणात रहाते व कोलेस्ट्रॉल कमी होते म्हणून हृदयाच्या आरोग्यासाठी अक्रोडचे सेवन अवश्य करावे. 4 ते 5 अक्रोड रात्री पाण्यात भिजायला ठेवा सकाळी कपभर दूधासोबत खाल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

आपल्याला बुद्धिवर्धक अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी  फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *