vajan vadhvanyasathi sopya tips
- इन्फोमराठी

झटपट वजन वाढवण्यासाठी सोप्या टिप्स

कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही अशी अनेकांची समस्या असते. प्रमाणापेक्षा कमी वजन असणे आरोग्यासाठी चांगल नसत. अशक्तपना असल्यास कोणताही आजार आपल्याला लवकर होण्याची शक्यता असते. जर आपले ही वजन कमी असेल आणि आपण ते वाढवू इच्छित असाल तर हे उपाय आपल्यासाठीच आहेत.

सकाळच्या नाश्त्यामध्ये दररोज दूधासोबत केळी खाल्ल्याने वजन वेगाने वाढते. बदामाचे दूधसुद्धा वजन वाढविण्यात खूप मदत करते. आपल्याला वजन वाढवायचे असल्यास आपण रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे बदामाची पावडर मिसळून ते दुध प्या. असे केल्याने आपल्याला फरक दिसेल.

दुधासोबत काळे खजूर खाल्ल्याने सुद्धा वजन वाढते. हिरवा पालक, ब्रोकोली, अशा पालेभाज्या शक्य तितक्या जास्त प्रमाणात खा. तुमच्या वजनात लवकर फरक दिसेल. बटाटे, तांदूळ, दही यांचा समावेश आहारात समावेश करा आपल्याला लवकर त्याचा परिणाम दिसून येईल.

जेवनात पनीराचा समावेश करा. पनीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या हाडांसाठी चांगले असते. याशिवाय पनीरामध्ये कॅलरीज देखील जास्त असतात. वजन वाढण्यासाठी मनुके रात्री पाण्यात भिजवून रोज सकाळी खा. असे केल्याने आपले वजन लवकर वाढेल.

वजन वाढण्यासाठी भिजवलेले सोयाबिन खा सोयाबीन मध्ये प्रथिन, लोह आणि फॅट असतं. त्यामुळे ताaकद, वजन वाढवण्यासाठी मदत होते. वजन वाढवण्यासाठी आपल्या आहारात सुकामेवा म्हणजेच बदाम, अंजीर, काजू, काळे मनुके अशा गोष्टींचा समावेश करा.

आपण मांसाहार करत असल्यास वजन वाढवण्यासाठी आपण चिकन, मटन, उकडलेली अंडी यांचा आपल्या आहारात समावेश करू शकता. आहाराबरोबरच वजन वाढवण्यासाठी आपण नियमित थोडा वेळ शारीरिक व्यायाम हि करणे गरजचे आहे. 

वजन वाढण्यासाठी ताणमुक्त राहणे गरजेचे आहे. शक्य तितके ताणमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. या बरोबरच पुरेसा व्यायाम ही गरजेचा आहे. भरपूर झोप घ्या. 7-8 तास झोप घेतल्यास वजन वाढण्यास मदत होते. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचे पचन व्यवस्थित होते.

आपल्याला झटपट वजन वाढवण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *