peru khanyache fayde
- आरोग्य

पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

पेरू हे कमी पैशात पुरेपूर पोषण देणारे असे फळ आहे. पिकलेला पेरू हा आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. पेरूचे झाड सदाहरित असते. पेरूची पाने जाड, गोलसर,कड, व सुगंधी असतात. कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा किंवा लाल असतो. पेरू हा भरपुर बियांनी भरलेला असतो. आज आपण जाणून घेणार आहोत पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर ‘क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ आहे.

पेरू हा कच्चा असताना तुरट लागतो. पिकल्यावर गोड लागतो. पेरू या फळात व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच पेरूचे सेवन केल्याने त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम होऊ शकतात.

पिकलेल्या पेरूपेक्षा कच्च्या पेरूत व्हिटामिन सीची मात्रा अधिक असते. जेवणापूर्वी पेरू नियमित खाल्याने बद्धकोष्टतेची तक्रार होत नाही.

मलावरोधाचा त्रास होत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरूचे सेवन करा किंवा त्याची भाजी बनवून खा, यामुळे आतडय़ांची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होते.

पेरूला काळ्या मिठासोबत खाल्ले तर पचनसंबंधी समस्या दूर होतात. पचन क्रिया खूप चांगली होती. पेरू खाल्याने आपली पचन क्रिया दुरुस्त होण्यास मदत मिळते.

पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार, हिरडय़ांची सूज व मुख विकार दूर होतात.

नियमित पेरू खाल्याने आपल्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होत नाही. कारण पेरूमध्ये असणारे विटामिन सी हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.

पेरूची पाने रुची उत्पन्न करणारी असतात. आपल्या तोंडाला चव नसल्यास पेरूची कोवळी पाने चघळल्याने आपल्या तोंडाला चव येईल. जुलाब होत असल्यास पेरूच्या पानांचा काढा करून प्यायल्यास जुलाब कमी होतात.

जर आपल्या दातांमध्ये वेदना होत असेल तर पेरूच्या झाडाची पानं पाण्यात उकळून घ्या. नंतर पाणी गाळून थंड करा, त्यामध्ये तुरटी मिसळून गुळणा केल्याने दात दुखणं कमी होत.

वजन कमी करण्यासाठी पेरूची पान उपयुक्त आहे. शरीरातील फॅट नियंत्रणात ठेवण्यासाठी या पानांमध्ये असणारे गुणधर्म मदत करतात. पेरूची पानं सुकवून त्याची पावडर करून ठेवा. पाण्यामध्ये एकत्र करून घेतल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल.

आपल्याला पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थलाईन आणि मेडलाईफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *