sakali karlyacha jus pinyache fayde
- आरोग्य

सकाळी कारल्याचा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे

कारलं कडू असल्याने कारल्याचा रस आपण पित नसाल पण कारल्याचा रस पिण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या रसाला कधीही नाही म्हणणार नाही. चला तर जाणुन घेउयात सकाळी कारल्याचा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे.

सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा ज्यूस पिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि मधुमेहावर नियंत्रण मिळते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करायची असेल तर आज पासूनच सुरुवात करा.    

दाद, खरुज, नायटा यांसारख्या त्वचा रोगांवर कारल्याचा रस गुणकारी आहे. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.

सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने भूक वाढण्यास मदत मिळते आणि पचन क्षमता देखील सुधारू शकते. रिकाम्या पोटी कारल्याचा ज्यूस पिल्याने यकृत निरोगी राहते आणि त्याचे कार्य सहजतेने चालण्यास मदत मिळते.

दमा, सर्दी, खोकला असल्यास कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे विकार दूर होतात.

कारल्याच्या रसामध्ये लिंबू मिसळून प्यायल्यास चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स आणि त्वचेच्या आजारापासून मुक्ती मिळते. कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात पिणे शक्य होत नाही यामुळे थोड़े थोड़े प्रमाण वाढवू शकता.

पोटात गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याचा रस पिल्याने आराम मिळतो. तोंडात फोड आले असल्यास कारल्याच्या रसाने गुळणा करा, याने आराम मिळेल. कारल्याचा रस प्यायल्यास डोळे निरोगी राहतात. कारले खाल्ल्याने डोळ्यांचे आजार होत नाहीत.

आपल्याला सकाळी कारल्याचा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची पूर्णता, विश्वसनीयता आणि अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावीत किंवा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: नवभारत टाईम्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *