kaju khanyache fayde
- आरोग्य

काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी मोठ्या प्रमाणात असते, तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते.चला तर जाणुन घेउयात काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

रोज सकाळी रिकाम्या पोटी ४ ते ५  काजू मधासोबत खा. यामुळे स्मरणशक्ती व बुद्धी वाढण्यासाठी मदत मिळते. काजुमध्ये लोह मोठ्या  प्रमाणात असते. यामुळे ज्याना शरीरात रक्ताची कमतरता आहे, त्यांनी नियमित काजू खा काही दिवसात फरक जाणवेल.

काजूचे खाल्याने हिरड्यांना ताकद मिळते आणि दात चमकदार होण्यास मदत होते. काजू खाल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते. त्यात प्रथिने जास्त असतात आणि ते लवकर पचते. काजू लोहाचा चांगला स्रोत मानला जातो, म्हणून आपण अशक्तपणा दूर करण्यासाठी ते खाऊ शकता.

काजूमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहेत. काजू खाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच काजूत असणाऱ्या एनर्जीमुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तो १०० टक्के कमी होतो आणि कालांतराने कमी होतो.

काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. काजू खाल्याने केस आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून पायात मोजे घालावेत, काही दिवसातच भेगा नाहीशा होतात.

काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं. शिवाय कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजूचे सेवन करू शकतो.

महत्वाची सुचना – काजू उष्णतावर्धक असल्याने ४ ते ५ च खावेत. जास्त प्रमाणात खाल्ल्यास उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असते.

आपल्याला काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: एन. डी. टी. व्ही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *