kiwi fal khanyache fayde
- आरोग्य

किवी फळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

किवीचे फळ बाहेरून चिकू सारखे दिसते आणि आतून मऊ आणि हिरवे असते. त्यामध्ये लहान काळया बिया असतात, या फळाची काहीशी चव तुरट अशी असते. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या या फळाचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही हे फळ नक्की चाखून पहाल.

किवीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडेंट्स आणि अनेक प्रकारचे खनिजे आढळतात, जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. चला तर जाणुन घेउयात.

किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असल्यामुळे, किवी खाल्याने रोग प्रतिरोधक क्षमता वाढण्यास मदत मिळते. दिवसभराच्या कामानंतर येणारा थकवा दूर करण्यासाठी किवी खाऊ शकता.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे किवी आपल्या शरीराला लोह शोषण्यास मदत करते. किवीमध्ये असलेले सेरोटोनिन नावाचे तत्व आपल्याला चांगली झोप येण्यास मदत करतात.

किवीमध्ये फॉलिक एसीड असल्याने गर्भवती महिलांनी डॉक्टरच्या सल्ल्याने किवीचे सेवन करू शकतात. किवी खाल्याने मुलाच्या मेंदूच्या विकासास मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

किवीमध्ये असणारे फायबर आणि पोटॅशियम हृदयरोगापासून आपल्यापासून दूर राहण्यास मदत करतात. किवी खाल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

किवीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास आपण किवी खाऊ शकता. किवीमध्ये पोटॅशियम हा घटक असतो जो हाडे आणि स्नायूंना बळकट करण्यास मदत करतो.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे, कीवीचे सेवन केल्याने आपली त्वचा खूप मऊ आणि चमकदार बनते. यामुळे शरीराची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

किवी खाल्याने त्वचा मऊ, चमकदार आणि सुरकुत्या मुक्त राहण्यास मदत मिळते. कीवीचे सेवन केल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

आपल्याला किवी फळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थीफायमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *