haldiche dudh pinyache fayde
- आरोग्य

१ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

दुधात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हळद असलेले दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हळदीचं दूध नियमित प्यायल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात. चला जाणून घेऊयात  हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

दररोज रात्री एक ग्लास कोमट दुधात दोन चमचे हळद मिसळून प्यायल्याने  सांधे दुखीत आराम मिळतो. हळदीमध्ये आढळणाऱ्या अँटिबायोटिक्स आणि दुधात असणाऱ्या कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात, सांध्यातील वेदना कमी होतात.

सर्दी, कफ झाले असेल तर “हळदीचे दूध” त्यावर रामबाण उपाय आहे. रात्री एक कप हळदीचे दूध प्यायल्यास सर्दी कमी होण्यास मदत मिळेल. रात्री एक कप हळदीचे दूध प्यायल्यास शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

एक कप हळदीचे दूध प्यायल्यास पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. हळदीचे दूध प्यायल्यास चेहऱ्यावर चमक येते आणि मुरुम आणि सुरुकुत्या कमी होतात.

रात्री तुम्हाला झोप येत नसेल तर रात्री झोपण्याआधी आपण एक ग्लास दुधामध्ये चमचाभर हळद पावडर मिसळून प्या. असे केल्याने चांगली झोप लागण्यास मदत मिळते. हळदीमध्ये असणाऱ्या अमिनो असिडमुळे हळदीचं दूध प्यायल्याने  झोप चांगली लागण्यास मदत मिळते.

खोकला येत असल्यास हळद असलेले दूध पिल्याने खोकला कमी होण्यास मदत मिळते. रात्री एक कप हळदीचे दूध प्यायल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. कोमट दुधात हळद टाकुन प्यायल्यास मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

आपल्याला १ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्मइजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *