सफरचंद जगभरात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट घटक असतात. सफरचंदात व्हिटॅमिन बी आणि सी जास्त प्रमाणात आढळतात. रिकाम्या पोटी रोज 1 सफरचंद खाल्यास रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत होते. चला तर जाणुन घेउयात सफरचंद खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.
जर आपण बद्धकोष्ठता किंवा गॅसच्या समस्येने ग्रस्त असल्यास, सफरचंद सेवन आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. सफरचंद मध्ये आढळणारे फायबर हळूहळू पोटाची बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतात.
सफरचंदांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने सफरचंद खाल्यास दात निरोगी आणि मजबूत होतात. सफरचंद खाल्ल्याने तोंडात तयार होणा-या लाळचे प्रमाण वाढते, ज्यामुळे दातातील बॅक्टेरियातील संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
सफरचंदांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने, सफरचंद खाणे किंवा त्याचा रस दररोज पिल्याने हाडे मजबूत होतात. सफरचंद खाल्यास चेहर्या वरील काळे आणि पांढरे डाग कमी होतात. शिवाय आपल्या चेहऱ्यावर चमक येते.
सफरचंद दररोज खाल्यास तुमच्या शरीरात असणारी अनावश्यक चरबी हळूहळू कमी होते, ज्यामुळे तुम्ही आकर्षक दिसता. सफरचंद दररोज खाल्यास शरीरात टाइप -2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
त्यात उपस्थित असणारे घटक शरीरातील ग्लूकोजची कमतरता पूर्ण करतात. शरीरात पुरेसे ग्लूकोज असल्यास आपल्याला इंसुलिन घेण्याची आवश्यकता भासत नाही.
सफरचंद रक्तपेशींच्या निर्मितीसाठी गुणकारी आहे. सफरचंदात तंतूचे प्रमाण जास्त असते जे आपली पचन क्रिया सुधरवण्याचे कार्य करते.
आपल्याला सफरचंद खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.
आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: आजतक हेल्थ