bhijavlele manuke khanyache fayde
- आरोग्य

भिजवलेले मनुके खा मिळतील आश्चर्यकारक फायदे

मनुके खाणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते. मनुक्यामध्ये  लोह, पोटॅशियम फायबर असे शरीराला उपयोगी घटक असतात. मनुक्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. चला तर जाणून घेऊयात मनुक्याचे सेवन कशा पद्धतीने केल्यावर कोणते फायदे होतात.

मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मनुका हा रक्तवर्धक असतो. मनुके खाण्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, रक्त वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो.

त्याचबरोबर वजन वाढण्यास ही मदत होते. झोपण्याच्या एक तास आधी उकळून थंड केलेल्या दुधासोबत  मनुक्यांचे  सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते. खासकरून बद्धकोष्टावर हा उपाय करून पाहिल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.

दररोज मनुके खाल्ल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे दररोज मूठभर मनुके तरी खाल्ले पाहिजेत. नियमित मनुक्यांचं सेवन केल्यानं स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

रक्तदाबाची समस्या असल्यास रात्री अर्धा ग्लास पाण्यात ८-१० मनुके भिजवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते पाणी प्या. इच्छा असल्यास भिजवलेले मनुकेही तुम्ही खावू शकता.

यामुळे रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच फायदा होईल. मनुके खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो त्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.

नियमित मनुक्यांचं सेवन केल्यानं हिरड्या आणि दात मजबूत राहतात. मनुक्यांमध्ये असे घटक असतात जे तोंडातील बॅक्टेरियांशी लढतात यामुळे दात किडण्याची समस्या, हिरड्यांचे आजार होत नाहीत.

मनुके खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. मनुकांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही राखले जाते. मनुकांमध्ये बोरॉन नावाचा घटक असतो, जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.

आपल्याला भिजवलेले मनुके खाण्याचे  फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: हेल्थीफायमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *