ukadlele ande khanyache fayde
- आरोग्य

उकडलेले अंडे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उकडलेल्या अंड्यामध्ये प्रथिने, काबरेहायड्रेट, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२ असे घटक असतात. हे सर्व पोषक घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. चला तर जाणुन घेऊयात उकडलेली अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

उकडलेली अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात रोजच्या श्रमाने आपल्या हाडांची झीज होत असते उकडलेले अंडे खाल्याने ही झीज भरून निघते. उकडलेले अंडे खाल्याने अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.  

उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे केसांना मजबूत करते आणि डोळ्यासाठी चांगले असते. आहारात उकडलेल्या अंड्याचे वापर केल्यास त्यातून भरपूर प्रथिने मिळतात. उकडलेल्या अंड्यातील पिवळ बलकामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे हाडे मजबूत बनवते तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

उकडलेल्या अंड्यामध्ये ल्यूटीन हा अँटी ऑक्सिडंट घटक असतो. उकडलेल्या अंड्याचे सेवन केल्याने आपली दृष्टी चांगली राहते. वाढत्या वयातील मुला मुलींना त्यांच्या स्नायू व हाडांची वाढ चांगली होण्या करता उकडलेले अंडे देऊ शकता.

महत्वाची सुचना –  ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग आहे त्यांनी अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये. कारण त्यामध्ये कोलोस्ट्रोलचे  प्रमाण जास्त असते.

आपल्याला उकडलेले अंडे खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  

आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *