भारतामध्ये तुळशीला सर्वात पवित्र औषधी वनस्पती मानलं जातं. तुळशीत एंटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे घटक पोटातील समस्यांसाठी खूप फायदेशीर असतात.
तुळशीची पाने अनेक प्रकारच्या औषधांमध्ये देखील वापरली जातात. इतकेच नाही तर बऱ्याच प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्येही तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. चला तर जाणुन घेउयात तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे.
तुळशीची पाने खाल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. ताजी तुळशीची पान रोज खाल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. रोज ४-५ तुळशीची पाने खाल्याने शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
जेवणानंतर तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पोटातील सर्व विकार दूर होतात. जर गर्भवती महिलांना मळमळ होत असेल तर त्यांनी ४- ५ तुळशीची पाने खाल्यास आराम मिळतो.
खोकला येत असल्यास ४- ५ तुळशीची पाने मधासोबत खाल्याने आराम मिळेल. जर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने खाल्याने आपल्याला दुर्गंधीपासून मुक्तता होऊ शकते.
दाढ दुखत असल्यास तुळशीची पाने खाल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळेल. घसा खवखवत असल्यास १ ग्लास कोमट पाण्यात तुळशीच्या पानाचा रस टाकुन प्या असे केल्याने घश्याला आराम पडतो.
तुळशीची पाने शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. दररोज तुळशीची पाने खाल्याने तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य राहते. सारखे तोंड कोरडे पडत असल्यास तुळशीची पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो.
तोंडाला चव नसल्यास तुळशीची पाने खाल्याने तोंडाला चव येते. आपल्याला तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.