dahi khanyache fayde
- आरोग्य

१ वाटी दही खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

तुम्हाला आठवतय का? परीक्षा द्यायला जात असताना आई आपल्याला दही साखर खायला द्यायची. भारतामध्ये परीक्षा किंवा नोकरीच्या मुलाखतीसारख्या महत्त्वाच्या घटनेपूर्वी गोड दही खाणे शुभ मानले जाते. 

दह्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. आज जाणून घेउयात दही खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत.

रोज १ वाटी दही खाल्याने अपचन, बद्धकोष्ठता, गैसेस होणे या सारखे पोटाचे आजार होत नाही. तसेच पाचन शक्ती सुधारण्यास मदत मिळते. दही खाल्याने रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते.

तोंडाला आतून फोड आले असल्यास  त्यावर दह्याची मलई लावल्याने आराम मिळतो. दह्यामध्ये असणारं सी आणि डी विटॅमिन्समुळे हाडांसोबत दातांना मजबूत ठेवण्यास मदत होते.

दही पचायला हलके असते. दह्यामुळे जठरातील आणि आतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते, जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.

पोट बिघडले असेल तर भातासोबत दही खाल्ल्याने आराम मिळतो. दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. दह्याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. केसांमध्ये कोंडा झाल्यास. दही केसांच्या मूळांशी लावल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.

आपल्याला दही खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *